ETV Bharat / state

विविध मागण्यांसाठी सांगलीत माजी नगरसेवकाचे आंदोलन; ड्रेनेजच्या पाण्याने केला अभिषेक

सांगली शहरातील उपनगर असणाऱ्या विश्रामबाग याठिकाणी काही महिन्यांपासून नागरी सुविधांच्या बाबतीत प्रभागाचे नगरसेवक आणि पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, असा आरोप या प्रभागातील माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केला. याच्या निषेधार्थ गायकवाड यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या विरोधात आंदोलन केले.

author img

By

Published : Oct 28, 2020, 6:27 PM IST

Updated : Oct 28, 2020, 7:08 PM IST

former congress corporator agitate over various demands sangli
विविध मागण्यांसाठी सांगलीत माजी नगरसेवकाचे आंदोलन

सांगली - उपनगरामध्ये नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाने पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या विरोधात आंदोलन केले. महापालिका कार्यालयाच्या दारामध्ये प्रभागाचे नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक दगडांना ड्रेनेजच्या पाण्याने अभिषेक घालत, नागरी सुविधा तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.

माजी नगरसेवक युवराज गायकवाड प्रतिक्रिया देताना.

सांगली शहरातील उपनगर असणाऱ्या विश्रामबाग याठिकाणी काही महिन्यांपासून नागरी सुविधांच्या बाबतीत प्रभागाचे नगरसेवक आणि पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, असा आरोप या प्रभागातील माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केला. विश्रामबाग परिसरामध्ये सर्वसामान्यांच्या बरोबर उच्चभ्रू वस्ती आहे. जवळपास सर्वच नागरिक महापालिका प्रशासनाचे सर्व कर भरतात. मात्र, याठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात गटारी तुंबल्या आहेत. गटारीचे कामही अर्धवट आहेत. ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आलेला आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिलेले आहे. कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार प्रभागाचे नगरसेवक, पालिका प्रशासन यांच्याकडे तक्रारी करूनही सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप युवराज गायकवाड यांनी केला.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेच्या दारात नगरसेवक आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक दगडांना ड्रेनेजच्या पाण्याने अभिषेक घालत निषेध नोंदवला. त्याबरोबर येत्या काही दिवसांमध्ये नागरी समस्या सोडवण्याच्या बाबतीत पुढाकार घेण्यात आला नाही तर प्रभागाचे नगरसेवक, पालिका प्रशासनाचे अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही गायकवाड यांनी दिला.

Last Updated : Oct 28, 2020, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.