ETV Bharat / state

'कृषी खाते झोपेत, तर सरकारलाच झालाय कोरोना' - sadabhau khot on BJP

केंद्र सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याच्या निमित्ताने बिचूद येथे माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

sadabhau khot in sangli
केंद्र सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याच्या निमित्ताने बिचूद येथे खोत यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
author img

By

Published : Jun 11, 2020, 4:25 PM IST

Updated : Jun 11, 2020, 5:23 PM IST

सांगली - राज्यात शेतीमाल खरेदी करण्यात कृषी खाते अपयशी ठरले असून या सरकारलाच कोरोना झाल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. केंद्र सरकारने शेतीमाल नियमन मुक्त केल्याच्या निमित्ताने बिचूद येथे खोत यांच्या नेतृत्वाखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

सरकारलाच कोरोना झाल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
केंद्र सरकारने नुकतेच शेतकऱ्यांचा शेतीमाल अत्यावश्यक सेवेतून वगळून नियमन मुक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन विकण्यात येणाऱ्या अडचणी कमी झाल्या आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारच्या या निर्णयाचे रयत क्रांती संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले. वाळवा तालुक्यातील बिचूद येथे आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयासाठी आभार मानले. ढोल-ताशांच्या गजरात ग्रामस्थांनी मिळून या निर्णयाचे स्वागत केले. सोशल डिस्टन्स आणि मास्क लावून सर्वजण रस्त्यावर उतरले होते.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना उत्पादन संपूर्ण देशात कुठेही विकता येणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधताना, सरकारने शेतमाल अद्याप खरेदी न केल्याने तो पडून असल्याचा आरोप त्यांनी केला. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला. या परिस्थितीत कृषी विभाग सक्षम असणे गरजेचे होते. मात्र कृषी आणि पणन विभाग झोपलेल्या अवस्थेत असून केवळ राज्य सरकारचे आरोग्य आणि गृहखाते काम करत आहे, असे खोत यांनी म्हटले. सरकारला कोरोना झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

Last Updated : Jun 11, 2020, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.