सांगली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे जनजीवनासह आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहे. त्यातच जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. परिणामी जिल्ह्यातील फुल उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात फुलांची शेती केली जाते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात कार्नेशन, जिप्ससो, शेवंती, गुलाब, जरबेरा, झेंडू, निशिगंधा, गलांगडा, असटर अशा अनेक प्रकारचे फुलांची या वेळी उत्पादन घेण्यात आले होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारने लग्न, जत्रा, उरूस, यात्रा, समारंभ यांना बंदी घातली आहे.
वास्तविक पाहता जानेवारी ते जून या महिन्यात फुलांचे मोठ्या प्रमाणात खप होत असतो, आणि फुल उत्पादक यांना चांगले उत्पन्न मिळत असते. परंतु आशा या महत्वाच्या कार्यक्रम समारंभावर बंदी घातली आणि लॉकडाऊन जाहीर झाला. यामुळे फुले बाजारात येऊ शकली नाहीत. शिवाय अशा परिस्थितीत गेल्या आठवड्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने या फुल उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
फुलांची तोडणी न झाल्याने ती जागेवरच वाळून जात होती. त्यातच अवकाळी पावसामुळेही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.