सांगली - तब्बल पाच दिवसानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले आहेत. सांगलीतील हिराबाग चौक या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आर्मी कडून पूरस्थिती आणि बाहेर काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या बाबतचा आढावा घेतला. मात्र, यावेळी सांगलीवाडीकर पूरग्रस्त नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या पाहणी बाबत रोष व्यक्त केला.
नागरिकांप्रमाणेच मुख्यमंत्री याठिकाणी आले आणि गेले अशा संतप्त प्रतिक्रिया पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांनी जाऊन पाहणी करायला हवी होती. किमान पुराच्या पाण्यात एक पाउल तर ठेवायला हवे होते, असा संताप पूरग्रस्त नागरिकांनी व्यक्त केला आहे.