ETV Bharat / state

'सक्तीच्या कर्ज वसुलीला विरोध' यासह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्त महिलांचा मूक मोर्चा

'महिला कर्जमुक्ती अभियान' या संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांकडून मूक मोर्चा काढण्यात आला. बँकांच्या सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

Flood affected women march in Sangli to protest forced debt collection
सक्तीच्या कर्ज वसुलीला विरोध करण्यासाठी सांगलीतील पूरग्रस्त महिलांचा मोर्चा
author img

By

Published : Dec 9, 2019, 4:41 PM IST

सांगली - जिल्हा आणि शहरातील पूरग्रस्त भागातील महिला बचत गटांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्त महिलांनी सोमवारी मूकमोर्चा काढला. 'महिला कर्जमुक्ती अभियान' या संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी बँकांच्या सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. विश्रामबाग चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

सक्तीच्या कर्ज वसुलीला विरोध करण्यासाठी सांगलीतील पूरग्रस्त महिलांचा मोर्चा

हेही वाचा... अमित शाह यांच्याकडून नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर, विधेयकाच्या बाजूने 293 तर विरोधामध्ये 82 मते

सांगली शहरात ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात हजारो कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. सरकारकडून या पूरग्रस्त कुटुंबांना थोडीफार मदत देण्यात आली. मात्र या महापूराने सांगली जिल्ह्यातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. याचा फटका महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. पूरग्रस्त भागातील हजारो महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स व इतर वित्तीय संस्थांच्या कडून कर्जे घेतली आहेत. यामुळे या महिला बचत गटांची कर्जमाफी आणि वसुली थांबवण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सरकारकडे केली होती.

हेही वाचा... हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी SIT गठीत, टीमचं नेतृत्व 'या' मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे

जिल्हा प्रशासनाकडून फायनान्स इतर वित्तीय संस्थांना सक्तीची कर्ज वसुली करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवून मायक्रो फायनान्स कंपन्या महिला बचत गटांच्याकडून सक्तीने वसुली करताना दिसत आहे. याच्या निषेधार्थ सांगली शहरातील पूरग्रस्त महिलांनी सोमवारी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

हेही वाचा... नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला

पूरग्रस्त क्षेत्रातील मायक्रो फायनान्स आणि इतर वित्तीय संस्थांची सक्तीची कर्ज वसुली बंद करावी, फायनान्स कंपन्यांच्या सी.आर.एस. फंडातून कर्जमाफी मिळावी, याकरिता प्रशासनाने हस्तक्षेप करावे. तसेच पूरग्रस्त भागातील महिला, कर्जदार आणि बचतगटाचे पूनर्वसन व्हावे, याकरता राष्ट्रीय बँकांमार्फत मुद्रा योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजने अंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करावीत. आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आल्या. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या कर्ज वसुलीबाबत तोंडाला काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला.

Intro:File name - mh_sng_03_purgrast_mahila_morcha_vis_01_7203751 - to - mh_sng_03_purgrast_mahila_morcha_byt_04_7203751

स्लग - सक्तीच्या कर्ज वसुली विरोधासह विविध मागण्यांसाठी पूरग्रस्त महिलांनी काढला मूक मोर्चा...

अँकर - पूरग्रस्त भागातील महिला बचत गटांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सांगलीतील पूरग्रस्त महिलांनी आज मूकमोर्चा काढला.महिला कर्जमुक्ती अभियान या संघटनेच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत,बँकांच्या सक्तीच्या वसुलीच्या विरोधात तोंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आला.Body:सांगली शहरातील ऑगस्ट मध्ये आलेल्या महापुरात हजारो कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले.शासनाकडून या पूरग्रस्त कुटुंबांना थोडीफार मदत देण्यात आली आहे.मात्र या महापूराने सांगली जिल्ह्यातील अर्थ व्यवस्था कोलमडली आहे.याचा फटका व्यापारा बरोबर महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.पूरग्रस्त भागातील हजारो महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून मायक्रोफायनान्स व इतर वित्तीय संस्थांच्या कडून कर्जे घेतली आहेत.यामुळे या महिला बचत गटांची कर्ज माफ़ी आणि वसुली थांबवण्याची मागणी अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी सरकारकडे केली होती.याबाबत जिल्हा प्रशासनाकडून फायनान्स इतर वित्तीय संस्थांना सक्तीची वसुली करू नये ,अश्या सूचना दिल्या होत्या.मात्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून मायक्रोफायनान्स कंपन्यांना महिला बचत गटांच्याकडून सक्तीने वसुली सुरू केली आहे.याच्या निषेधार्थ आज सांगली शहरातील पूरग्रस्त महिलांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. विश्रामबाग चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत निघालेल्या या मूक मोर्चा मध्ये पूरग्रस्त महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
पूरग्रस्त क्षेत्रातील मायक्रोफायनान्स आणि इतर वित्त संस्थांची सक्तीची कर्ज वसुली बंद करावी, फायनान्स कंपन्यांच्या सी.आर.एस.फंडातून कर्जमाफी मिळावी, याकरिता प्रशासनाने हस्तक्षेप करावे. आणि पूरग्रस्त भागातील महिला,कर्जदार आणि बचतगटाचे पूनर्वसन होणे करिता राष्ट्रीय बँकांच्यामार्फत मुद्रा योजना आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज प्रकरणे मंजूर करावीत.तसेच पूरग्रस्त भागातील केशरी रेशनकार्ड धारकांना तातडीने धान्य सुरू करावे ,अश्या मागण्या करत मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत तोंडाला काळ्या फित्या लावून निषेध नोंदवला .

बाईट - कलावती पवार - नेत्या ,महिला कर्जमुक्ती अभियान Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.