ETV Bharat / state

लग्नात मर्यादेपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती, मगंलकार्यालयाला 50 हजारांचा दंड - Violation of corona rules sangli

लॉकडाऊनमध्ये लग्न करणे मिरजमधील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने, महापालिकेने मंगल कार्यालयाच्या मालकाकडून 50 हजारांचा दंड वसूल केला आहे.

लग्नात मर्यादेपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती, मगंलकार्यालयाला 50 हजारांचा दंड

author img

By

Published : May 8, 2021, 7:09 PM IST

सांगली - लॉकडाऊनमध्ये लग्न करणे मिरजमधील एका कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने, महापालिकेने मंगल कार्यालयाच्या मालकाकडून 50 हजारांचा दंड वसूल केला आहे.

सध्या सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यामध्ये पाच मे पासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. तर कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये नियम व अटी घालून केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लग्नाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र लग्नाला 50 पेक्षा अधिक जण उपस्थित राहिल्याने, महापालिकेच्या वतीने 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

मगंलकार्यालयाला 50 हजारांचा दंड

मर्यादेपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती

मिरज शहरातल्या किल्ला परिसरात असणाऱ्या सिद्धराज हॉलमध्ये विवाह सोहळा सुरू होता. या सोहळ्याला मर्यादेपेक्षा अधिक नागरिकांची उपस्थिती असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांना मिळाली. त्यानंतर घोरपडे यांनी पथकासह सिद्धराज हॉलवर छापा टाकला. या छाप्यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने मालकाला 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दिलीप घोरपडे यांनी ही दंडाची रक्कम वसूल केली

हेही वाचा - घरची परिस्थिती हलाखीची, तरीही शिर्डीची पायल करते विनामुल्य रुग्णसेवा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.