ETV Bharat / state

चोरी गेलेला 16 लाखांचा बकरा सापडला - बोकडाची जंगी मिरवणूक

दीड कोटींच्या प्रसिद्ध मोदी बोकडाचे वंश असणाऱ्या आटपाडीतील 16 लाख किमतीच्या बोकडाची दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती.

16 लाखांचा बकरा सापडला
16 लाखांचा बकरा सापडला
author img

By

Published : Dec 28, 2020, 5:51 PM IST

सांगली - 16 लाखांच्या बोकडाच्या चोरीचा अखेर छडा लागला आहे. आटपाडी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा चोरट्यांना अटक करत चोरलेला बोकड हस्तगत केले आहे. यानंतर बोकडाच्या मालकांनी पोलिसांचा सत्कार करत गावातून बोकडाची मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला आहे.

16 लाखांचा बोकड गेला होता चोरीला-

दीड कोटींच्या प्रसिद्ध मोदी बोकडाचे वंश असणाऱ्या आटपाडीतील 16 लाख किमतीच्या बोकडाची दोन दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सोमनाथ जाधव यांच्या या महागड्या बकऱ्याची हाय प्रोफाईल पद्धतीने एका आलिशान गाडीतून चोरी झाल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे आटपाडी नव्हेचं तर सांगली जिल्ह्यातील खळबळ उडाली होती. महागड्या बोकडाचा झालेल्या चोरीमुळे बोकड मालक सोमनाथ जाधव यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात बोकड चोरीचा गुन्हा दाखल केले होता.

आणि बोकडाचा लावला शोध-

16 लाखांचा बोकड चोरीच्या घटनेमुळे आटपाडी पोलिसांनी या चोरीचा गतीने तपास सुरू केला होता. तपास सुरू असताना सातारा जिल्ह्यातील कराड याठिकाणी एका संशयित गाडीतून बकरा घेऊन काही जण आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विटा पोलिसांनी यावेळी तिघा संशयीतांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असणारे बोकड ताब्यात घेतले. तसेच तिघांना अटक केली आहे.

पोलीसांचा सत्कार आणि बकराच्या जंगी मिरवणूक-

आटपाडी पोलिसांनी चोरीला गेलेला बोकड शोधून काढण्याची माहिती मिळतात सोमनाथ जाधव आणि आटपाडी येथील ग्रामस्थ हे आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये जमले. चोरीचा छडा लावल्याने पोलिसांचा सत्कार करत आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली. आटपाडी शहरातून 16 लाखांच्या बोकडाची जंगी मिरवणूक काढली.

हेही वाचा- Congress Foundation Day : मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्याचा संकल्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.