ETV Bharat / state

87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टराला अटक; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - मिरज क्राईम न्यूज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारासाठी मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटल कोविड सेंटरची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान गेल्या महिन्यात या रुग्णालयात रुग्णांची हेळसांड करून मृत्यूस कारणीभूत आणि अधिक बिले आकरल्याचा प्रकार समोर आला होता.

87 कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टराला अटक

author img

By

Published : Jun 19, 2021, 10:23 AM IST

मिरज (सांगली) - कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मिरजेच्या अपेक्स केअर हॉस्पिटलच्या प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव असे या डॉक्टराचे नाव आहे. महात्मा गांधी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

रुग्ण मृत्यू प्रकरणी डॉक्टरावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उपचारासाठी मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटल कोविड सेंटरची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान गेल्या महिन्यात या रुग्णालयात रुग्णांची हेळसांड करून मृत्यूस कारणीभूत आणि अधिक बिले आकरल्याचा प्रकार समोर आला होता. तर वाढत्या तक्रारीनंतर याप्रकरणी सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी हॉस्पिटलवर कारवाई केली होती. त्यानंतर सांगली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर महेश जाधव यांच्यासह कर्मचाऱ्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या फसवणूक प्रकरणी डॉ.जाधव यांना तात्पुरता जामीन मिळाला होता.

योग्य उपचाराअभावी 87 रुग्णांचा मृत्यू
दरम्यान या प्रकरणाचा तपास करत असताना महात्मा गांधी चौकी पोलिसांना रुग्णालयांमध्ये 205 रूग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यापैकी 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. तर रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रात त्रुटी आढळल्याने महात्मा गांधी चौक पोलिसांकडून याबाबत सखोल तपास करण्यात आला. ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. रुग्णालयात कोरोना नियमावली प्रमाणे उपचार करण्यात आले नसल्याची बाब समोर आली होती.

अद्यावत वैद्यकीय सुविधांचा नावाखाली फसवणूक !
कोरोना उपचारा दरम्यान कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटरची आणि अद्यावत, अशी सुविधा उपलब्ध नसताना सर्व सुविधा असल्याचे सांगून अनेक रुग्णांच्यावर उपचार करण्यात आलेत. याशिवाय शिकाऊ डॉक्टरांच्या निगराणीखाली हे सगळे उपचार करण्यात येत होते. त्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी डॉक्टर महेश जाधव यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्याकडे पसार होणार्‍या डॉक्टर महेश जाधव याला कासेगाव याठिकाणी ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.