ETV Bharat / state

जनावरांच्या चारा टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी गायीचा गोठा उभारत ठिय्या आंदोलन - जनावरे

तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे पशूधन संकटात सापडले आहे. जनावरांना लागणारा सुका चारा अपुऱ्या पावसामुळे म्हणावा तसा पिकलाच नाही. त्याचबरोबर शेतीला पाणी नसल्याने ओला चारा मिळणेच कठीण झाले आहे. जिथे ऊसाचे पीक शिल्लक आहे तिथे त्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तासगावच्या तालुकाध्यक्षाने थेट जनावरांचा गोटा उभारत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शेतकरी संघटनेचे तासगांव तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचा ठिय्या आंदोलन
author img

By

Published : May 10, 2019, 10:09 AM IST

सांगली - चारा टंचाई आणि तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने मणेराजूरी येथे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तासगावच्या तालुकाध्यक्षांनी थेट जनावरांचा गोटा उभारत हे आंदोलन सुरू केले आहे.

शेतकरी संघटनेचे तासगांव तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार यांचा ठिय्या आंदोलन

तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे पशूधन संकटात सापडले आहे. जनावरांना लागणारा सुका चारा अपुऱ्या पावसामुळे म्हणावा तसा पिकलाच नाही. त्याचबरोबर शेतीला पाणी नसल्याने ओला चारा मिळणेच कठीण झाले आहे. जिथे ऊसाचे पीक शिल्लक आहे, तिथे त्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पशू पालकांनी जनावरे जगवायची कशी, हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

यासंदर्भात शासनाकडून पुढाकार घेऊन मार्ग काढणे जरूरीचे होते. परंतु तसे काही होत नसल्याने तासगाव तालुक्याबाबत शासनाला जाग यावी, म्हणून शेतकरी संघटनेचे तासगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार हे चक्क जनावरांच्या गोठ्यात उपोषणाला बसले आहेत. तासगावच्या मणेराजूरी येथे शिकोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरूपाचा गोठा उभारत त्याठिकाणी आपली जनावरे बांधून गोठ्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

एक महिना उलटूनही प्रशासनाकडून जनावरांच्या चाऱ्याबाबत कोणत्याच प्रकारच्या हालचाली होत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याकडे आणि छावण्या सुरू करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन सुरू केल्याचे बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Avb

Feed send - file name - R_MH_1_SNG_09_MAY_2019_CHARA_ANDOLAN_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_3_SNG_09_MAY_2019_CHARA_ANDOLAN_SARFARAJ_SANADI

स्लग - जनावरांच्या चारा टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी गायीचा गोठा उभारत शेतकरी संघटनेने सुरू केले ठिय्या आंदोलन...

अँकर - चारा टंचाई आणि तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तासगावच्या तालुकाध्यक्षाने मणेराजूरी येथे थेट जनावरांचा गोटा उभारत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.Body:
तासगाव तालुक्यात निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाई मूळे पशुधन संकटात सापडले आहे.जनावरांना लागणारा सुका चारा अपुऱ्या पावसामुळे म्हणवसा पिकलाच नाही. त्याच बरोबर शेतीला पाणीच नसलेने ओला चारा मिळणेच कठीण झाले आहे.ऊसाचे पीक कुठेतरी शिल्लक आहे पण त्याचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे पशु पालकांनी जनावरे जगवयाची कशी हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.पण शासनाकडून पुढाकार घेवून मार्ग काढणे जरूरीचे होते पण तसं काही होत नसल्याने.तासगाव तालुक्याबाबत शासनाला जाग यावी म्हणून नुसते निवेदन न देता जनावरांच्या वेदना समजाव्यत यासाठी शेतकरी संघटनेचे तासगांव तालुका अध्यक्ष बाळासाहेब पवार हे चक्क जनावरांच्या गोटयात उपोषणाला बसले आहेत.तासगावच्या मणेराजूरी येथे शिकोबाच्या डोंगराच्या पायथ्याशी तात्पुरत्या स्वरूपाचा गोठा उभारत,त्या ठिकाणी आपली जनावरे बांधून गोठ्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.एक महिना उलटूनही प्रशासनाकडू जनावरांच्या चाऱ्याबाबत कोणत्या प्रकारच्या हालचाली होत नसल्याचा आरोप करत तालुक्यातील जनावरांच्या चाऱ्याकडे आणि छावण्या सुरू करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन सुरू केल्याचे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी सांगत,जोपर्यंत निर्णय होत नाही, तो पर्यंत हे उपोषण चालूच राहणार असल्याचे स्पष्ट केेेले आहे.

बाईट - बाळासाहेब पवार - तालुकाध्यक्ष ,शेतकरी संघटना ,तासगाव.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.