ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : प्रसिद्ध ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरुसाची ६४५ वर्षांची परंपरा खंडित, संगीत महोत्सवही रद्द - कोरोनाव्हायरस अपडेट

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरजेचा ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या दर्ग्याचा आजपासून ६४५ वा उरूस सुरू झाला आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, उरुसाच्या निमित्ताने मोठी गर्दी होऊन, हा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदाच्या उरुसाला परवानगी नाकारली असून दर्गा परिसरात १४४ कलाम लागू केले व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

प्रसिद्ध ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरुसाची ६४५ वर्षांची परंपरा खंडित

author img

By

Published : Mar 20, 2020, 4:22 PM IST

Updated : Mar 20, 2020, 4:49 PM IST

सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील ऐतिहासिक ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस यंदा खंडित झाला आहे. तसेच संगीत महोत्सवसुद्धा रद्द झाले आहे. यंदाचे हे ६४५ वर्ष आहे. मात्र, प्रशासनाने उरुसाला परवानगी नाकारत दर्गा परिसरात १४४ कलाम लागू केले आहे. त्यामुळे भाविकांना यंदा उरुसमध्ये सहभाग घेता येणार नाही.

प्रसिद्ध ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरुसाची ६४५ वर्षांची परंपरा खंडित

सांगलीच्या मिरजेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला प्रसिद्ध ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा उरूस 20 मार्चपासून सुरू झाला आहे. मात्र, यंदा या उरुसाची परंपरा खंडित झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदाच्या दर्गा उरुसाला परवानगी नाकारली आहे. महापालिका प्रशासनानेही अधिकारी स्टॉल विक्रेते, खेळणे व्यवसायिकांना परवानगी दिली नाही. तर, ३१ मार्चपर्यंत भाविकांना दर्गाप्रवेश बंदी करण्यात आली आहे.

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरजेचा ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध दर्ग्याचा आज 20 मार्च पासून ६४५ वा उरूस सुरू झाला आहे. दरवर्षी या उरुसाच्या निमित्ताने देशाच्या कानोकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी मिरजेत उपस्थितीत होतात. हा उरूस १५ दिवस चालतो. मात्र, यंदा या उरुसाची परंपरा खंडित झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, उरुसाच्या निमित्ताने मोठी गर्दी होऊन, हा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदाच्या उरुसाला परवानगी नाकारली असून दर्गा परिसरात १४४ कलाम लागू केले व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक बस सेवा बंद

दरगाह कमिटीनेही केवळ धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेत, भाविकांनि दर्ग्यामध्ये येऊ नये, असे आवाहन केले आहे. आजपासून सुरू झालेल्या या उरुसाच्या निमित्ताने केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ अर्पण करण्यात आला आहे. त्यामुळे उरूस जरी सुरू झाला असला, तरी केवळ धर्मिक विधी पुरता मर्यादित राहणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक उरुसाच्या परंपरेला खंड पडला आहे. यासोबत संगीत महोत्सवाची परंपराही खंडित झाली आहे.

संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या स्मृती प्रित्यार्थ ख्वाजा मिरासाहेब यांच्या सेवेत संगीत साधना अर्पण करण्यात येते. किराणा घराणे, तसेच देशातील दिग्गज शास्त्रीय गायक यानिमित्ताने मिरजतेत येऊन दर्गासमोर आपली गायकी सादर करतात. मात्र, हा संगीत महोत्सवसुद्धा रद्द झाला आहे. ३१ मार्च नंतर हा दर्गा भाविकांसाठी खुला राहणार असून, तोपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन दर्गा कमिटीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना: सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधींचे सौदे ठप्प...

Last Updated : Mar 20, 2020, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.