ETV Bharat / state

महामेळाव्यानंतर ओबीसी मोर्चे पाहा, प्रकाश शेंडगेंचा गर्भित इशारा - प्रकाश शेंडगे बातमी

महाराष्ट्राने आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे पाहिलेत, आता ओबीसी समाजाचे मोर्चे निघतील, असा गर्भित इशारा ओबीसी जनमोर्चाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.

बैठकीवेळचे छायाचित्र
बैठकीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : Jan 30, 2021, 9:48 PM IST

Updated : Jan 30, 2021, 10:23 PM IST

सांगली - महाराष्ट्राने आतापर्यंत मराठा समाजाचे मोर्चे पाहिलेत, आता ओबीसी समाजाचे मोर्चे निघतील, असा गर्भित इशारा ओबीसी जनमोर्चाचे नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. येत्या 27 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षण टिकवण्याबरोबर विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले. सांगली पार पडलेल्या ओबीसी जनमोर्चा बैठकीत ते बोलत होते.

बोलताना माजी आमदार प्रकाश शेंडगे

सरकार विरोधात ओबीसी देणार लढा

सांगलीतील मार्केड यार्डमधील सहकार भवनात शनिवारी (दि. 30 जाने.) ओबीसी जनमोर्चाच्या वतीने ओबीसी समाजातील नेत्यांची बैठक माजी आमदार व ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत यापुढे राज्यात ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी सर्व ओबीसी समाजाने एकत्र येऊन सरकार विरोधात लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.

आता रस्त्यावरची लढाई करणार

यावेळी बोलताना माजी आमदार शेंडगे म्हणाले, राज्यातील भटक्या विमुक्त जातीच्या विकासासाठी रेणके आयोग निर्माण करण्यात आला. या आयोगाच्या माध्यमातून अहवाल तयार करण्यात आला. मात्र, तो अहवाल केंद्राच्या दरबारात धूळ खात पडून आहे. ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी महा ज्योतीचा निर्माण करण्यात आले. मात्र, त्यालाही सरकारकडून निधी देण्यात आला नाही. आज राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण टिकविण्याचा ओबीसी समाजाची व इतर समाजाची जातिनिहाय जनगणना तसेच मेगा भरतीसह समाजाच्या हक्कांसाठी सरकार विरोधात लढा देण्यासाठी ओबीसी समाज रस्त्यावरच्या लढाईला सुरुवात करणार असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केला आहे.

महामेळाव्यातून फुंकणार रणशिंग

त्यासाठी येत्या 27 फेब्रुवारीला सांगलीमध्ये ओबीसी जनमोर्चा कडून ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला राज्यातील ओबीसी समाजातील मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित राहतील. सुमारे एक लाख ओबीसी समाज या मेळाव्याला हजेरी लावतील, असा विश्वास शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.

गायकवाड अहवालासाठी विशेष अधिवेशन घ्या..!

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गायकवाड समितीने तयार केलेला अहवाल बोगस असल्याच्या विधानावरून सुरू असलेल्या आंदोलनावरून शेंडगे म्हणाले, राज्य सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राज्याचे जबाबदार मंत्री जर जाहीरपणे अहवाल बोगस असल्याचे स्पष्ट करत असतील तर ते योग्य आहे की नाही किंवा त्या अहवालामध्ये काय लपले आहे, ते जनतेसमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने एक दिवसाचा विशेष अधिवेशन घ्यावे आणि महाराष्ट्रातील जनतेसमोर सत्य आणावे, असे आवाहन शेंडगे यांनी सरकारला केले आहे.

छत्रपतींचे वंशज ओबीसी आरक्षण बद्दल बोलत नाहीत..

साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले यांनी एकत्र व्यासपीठावरून मराठा आरक्षणासाठी राज्याच्या मराठा समाजाने एकत्र येण्याचा आवाहन केला आहे. त्यावरून बोलताना शेंडगे म्हणाले, हे दोन्ही राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असून ते आम्हाला वंदनीय आहेत. अठरापगड जमातींनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी, टिकवण्यासाठी या महाराष्ट्रात देह आणि रक्त सांडले आहे. त्यामुळे अठरापगड जातीच्या समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची नैतिक जबाबदारी ही छत्रपतींचे वंशज असणाऱ्या दोन्ही-तिन्ही राजेंची आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत हे राजे काहीही बोलायला तयार नाहीत याची खंत आहे. मात्र, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. त्यामुळे आम्हीही आता राज्यातील अठरा पगड जातीच्या मावळ्यांना आरक्षण टिकवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत असल्याचे शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - जुन्या वादातून मणेराजुरीत महाविद्यालयीन तरुणाचा खून, तिघा अल्पवयीन मुलांकडून हल्ला

Last Updated : Jan 30, 2021, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.