ETV Bharat / state

शहरात घुसला बिबटया ! राजवाडा चौकात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू - शहरात घुसला बिबटया ! राजवाडा चौकात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू.

शहराच्या मध्यवर्ती वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. राजवाडा चौक परिसरामध्ये एका कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केला. मात्र, अद्याप वन विभाग किंवा शासकीय अधिकाऱ्यांना हा बिबट्या दिसून आला नाही. मात्र नागरिकांकडून बिबटया दिसल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद
शहरात बिबट्या आल्याने घबराट
author img

By

Published : Mar 31, 2021, 12:41 PM IST

Updated : Mar 31, 2021, 12:54 PM IST

सांगली - शहराच्या मध्यवर्ती वस्तीत बिबट्या शिरल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.राजवाडा चौक परिसरामध्ये एका कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केला. घटनास्थळी सापडलेल्या ठश्यावरून वन अधिकाऱ्यांनी बिबट्या असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, अद्याप वन विभाग किंवा शासकीय अधिकाऱ्यांना हा बिबट्या दिसून आला नाही. नागरिकांकडून बिबटया दिसल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरात बिबट्या असल्याची चर्चा

हेही वाचा - शस्त्रक्रियेनंतर पवार आपल्या आवडत्या कामात मग्न; सुप्रिया सुळेंनी ट्विट करत दिली माहिती

मध्यवर्ती वस्तीत घुसला बिबटया !
वनविभाग,पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे या सर्व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पहाटेला हॉटेल राजवाडा चौक परिसरात असणाऱ्या चहा विक्रेत्याला बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत त्याची शोध मोहीम सुरू केली. तर राजवाडा चौकमधील पालिकेच्या व्यापारी संकुलात भटक्या कुत्र्याला फाडून टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी आढळलेल्या ठशांवरून वन विभागाकडून हे बिबट्याचे ठसे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याच्या शोधासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.वन विभाग ,महापालिका प्रशासन आणि पोलिस विभागाच्या माध्यमातून बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान शहराच्या मध्यवर्ती वस्तीत बिबट्या आल्याची बातमी शहरात पसरताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.तर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Last Updated : Mar 31, 2021, 12:54 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.