ETV Bharat / state

जाहीर प्रचाराचा झंझावात संपला; दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजला प्रचार - सांगली जाहीर प्रचार संपला

सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा झंझावात शनिवारी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता केली.

जाहीर प्रचाराचा झंझावात संपला
author img

By

Published : Oct 20, 2019, 10:00 AM IST

सांगली - जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा झंझावात शनिवारी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता केली. मात्र, जाहीर प्रचार संपल्याने आता छुप्या प्रचारावर भर दिला जाईल.

दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजला प्रचार

सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मागील 14 दिवसांपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बंडखोर अपक्ष उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर या बड्या नेत्यांनी युतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.

हेही वाचा - EVM म्हणजे नेमकं आहे तरी काय..?

काँग्रेस-काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया, कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी.पाटील या नेत्यांच्या सभा पार पडल्या.

Intro:File name - mh_sng_03_prachar_sangata_vis_01_7203751 - mh_sng_03_prachar_sangata_vis_03_7203751

स्लग - जाहीर प्रचारांचा झंझावात संपला,दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजली निवडणूक ...

अँकर - सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीतील जाहीर प्रचाराचा झंझावात आज संपला आहे,प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली ,पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराची सांगता केली आहे.या निवडणूकीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या भाषणांनी सभा गाजवल्या.
मात्र आता जाहीर प्रचार संपला असून छुप्या प्रचारावर भर राहणार आहे.Body:सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचा शिगेला पोहचलेले जाहीर प्रचार संपला आहे.गेल्या 14 दिवसांपासून भाजपा, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस तसेच बंडखोर अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.या आठ मतदार संघात दुरंगी आणि तिरंगी अशी निवडणूक पाहायला मिळाली.तर या निवडणूकीत भाजपा मध्ये बंडखोरी झाल्याचे दिसून आले.जत ,इस्लामपूर आणि शिराळा याठिकाणी भाजपातील नेत्यांनी युतीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे केले ,तर सांगलीत भाजपा समोर सेनेच्या बंडखोराने आपले आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला.तर या निवडणुकीत सर्वाधिक प्रचाराचा धडाका उठवून दिला,तो सत्ताधारी भाजपा महायुतीने,यावेळी जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री येडुरप्पा,केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी,गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ,कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी,उद्योग मंत्री जगदीश शेट्टर आदी नेत्यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्या,तर 8 पैकी 4 जागांवर लढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी शिवसेने प्रमुख उद्धव ठाकरे,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे,परिवहन मंत्री दिवाकर रावते,कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनीही जाहीर सभा घेतल्या,तर काँग्रेस आघाडीत 3 जागांवर लढणाऱ्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचाराला पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खासदार अमोल कोल्हे,यांनीही प्रचाराचा धडाका उडवून दिला होता,तर 5 पैकी 3 जागांवर लढणाऱ्या काँग्रेस उमेदवारांच्या दिमतीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट,कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या,केंद्रीय सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया, कर्नाटकचे माजी मंत्री एम.बी.पाटील या नेत्यांच्या सभा पार पडल्या.आणि सर्वच नेत्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवत आपल्या सभा गाजवल्या,तर भाजपातील बंडखोर व इतर अपक्ष उमेदवारांनीही आपल्या प्रचाराचा धडाका उडवून दिला.तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी रॅली, पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराची सांगता केली आहे.आता निवडणूकीतील जाहीर प्रचार आता संपला आहे,आणि मतदानाला एक दिवसांचा अजून अवधी आहे,त्यामुळे उमेदवारांकडून छुप्या प्राचारावर जोर असणारा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.