ETV Bharat / state

ED Raid in Sangli: सांगलीतील बड्या व्यवसायिक बंधूंच्या घरावर ईडीची छापेमारी, पारेख बंधूंच्या दोन्ही बंगल्यात चौकशी सुरू

ईडीकडून शहरातील व्यवसायिकांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. शिवाजीनगरमधील पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये ईडीचे छापे पडले आहेत. लाईट आणि सबमर्सिबल पंप विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या दोघा बंधूंच्या घरावर ईडीने ही धाड टाकली असून यामुळे एकच खळबळ उडली आहे.

ED Raid in Sangli
बड्या व्यवसायिक बंधूंच्या घरावर ईडीची छापेमारी
author img

By

Published : Jun 23, 2023, 3:48 PM IST

सांगलीतील बड्या व्यावसायिकांच्या घरावर ईडीचा छापा

सांगली : शहरामध्ये आज सकाळी ईडीच्या 10 अधिकाऱ्यांच्या पथकासोबत सीआरएफचे जवान दाखल होत, शहरातील नामवंत व्यावसायिकांच्या घरावर ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे. दोन पथकाच्या मदतीने शिवाजीनगर मधील पारेख बंधूंच्या दोन बंगल्यामध्ये ईडीचे अधिकाऱ्यांकडून झडती घेत चौकशी करण्यात येत आहे. सुरेश पारेख आणि दिनेश पारेख, असे या व्यवसायिक बंधूंची नावे आहेत. पारेख बंधूंचा शहरात इलेक्ट्रॉनिक्स लाईट विक्रीचा मोठा व्यवसाय आहे.

छाप्याबद्दल गुप्तता पाळण्यात आली : शहरातील गणपती पेठ येथे सुरेश लाईट हाऊस नावाचे त्यांचे इलेक्ट्रिकल्सचे मोठे दुकान आहे. व्यवसायातील आणि आर्थिक व्यवहारातील अनियमितता याच्या संशयावरून ईडीकडून हा छापा टाकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पारेख बंधूंच्या दोन्ही बंगल्यात सध्या ईडीकडून सर्व कागदपत्रांची तसेच गाड्यांची झडती घेत चौकशी करण्यात येत आहे. मात्र छाप्याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही. प्रचंड गुप्तता या छाप्याबद्दल पाळण्यात येत आहे.

ईडीचे मुंबईतही धाडसत्र सुरु : कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ईडीची संपूर्ण मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या देखील घरावर ईडीने छापेमारी केली. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या देखील घरावर ईडीने छापे टाकले आहेत. वांद्रे पूर्व येथे असलेल्या रुस्तमजी ओरियन या इमारतीतील संजीव जयस्वाल यांच्या घरावर सध्या ईडीची छापेमारी केली.

राजकीय वर्तुळात खळबळ : ईडीने शहरातील 15 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे बीएमसी कोविड घोटाळ्याशी संबंधित आहेत. महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांचा व इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीय शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणीही छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची यापूर्वी या प्रकरणाशी संबंधित ईडीने चौकशी केली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या एका व्यक्तीच्या घर आणि कार्यालयावर ईडीने सकाळीच छापेमारी केली आहे. एकूण 15 ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी सुरू केली आहे.

हेही वाचा -

  1. ED raids in Mumbai: मुंबईत ईडीची सलग १७ तास छापेमारी, ठाकरे निकटवर्तींयासह आयएएस अधिकारी, बीएमसी अधिकारी लागणार गळाला?
  2. COVID 19 Jumbo Centers Scam: 100 कोटींची संपत्ती ईडीच्या रडारवर...आयएएस संजीव जयस्वाल यांनी ईडीकडे मागितला चार दिवसांचा वेळ
  3. ED Raid in Mumbai : कोव्हिड सेंटरमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ईडीची दोन दिवस कारवाई, आतापर्यंत काय घडले?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.