सांगली - मिरजेतील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ असणार्या डॉक्टरला कोरोना लागण झाल्याने प्रशासन हादरून गेले आहे. प्रशसनाने कोरोना लागण झालेल्या डॉक्टरचे संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ क्वारंटाईन केला असून, यामध्ये 43 व्यक्तींचा समावेश आहे. डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा आता प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे.
मिरजेत डॉक्टरला कोरोनाची लागण; महापालिकेकडून संपूर्ण रुग्णालय सील सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसांपासून कमी झाली आहे. मंगळवारी दिवसभरात एकच कोरोना रुग्ण आढळून आला होता. बुधवारी मिरजेतील एका डॉक्टरला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मिरज शहरातल्या एका प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरला कोरोना लागण झाली आहे. या घटनेनंतर मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना लागण झालेले डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी होते. तसेच अनेक रुग्णांवर उपचार झाले असून, काही रुग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी त्या डॉक्टरांना कोरोना लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाची एकच धावपळ उडाली. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संबंधित डॉक्टरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यानंतर कोरोनाबाधित डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे रुग्ण, नर्स अशा ४३ जणांना हॉस्पिटलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉक्टरांच्याकडे मोठ्या प्रमाणात तपासण्यासाठी रुग्ण येऊन गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता प्रशासनाकडून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सध्या सांगली जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ही झाली आहे तर आजपर्यंत ३०० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे.