ETV Bharat / state

एका तरी भाजप नेत्याच्या कारखाण्यात इथेनॉल निर्मिती सुरू आहे का ? रघुनाथदादा पाटलांचा सवाल - sharad pawar

गडकरी आणि त्यांच्या पक्षाच्या एका तरी नेत्याच्या कारखान्यात ईथेनॉल निर्मिती सुरू आहे का ? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. तसेच पुण्यातील साखर परिषद ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ राजकीय परिषद होती, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेबाबत माहिती देताना शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:24 AM IST

Updated : Jul 10, 2019, 11:48 AM IST

सांगली- नितीन गडकरी यांनी साखर कारखानदारांना ईथेनॉल निर्मिती करण्याचे आवाहन केले होता. यावर गडकरी आणि त्यांच्या पक्षाच्या एका तरी नेत्याच्या कारखान्यात ईथेनॉल निर्मिती सुरू आहे का ? असा सवाल शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. पुण्यातील साखर परिषद ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून केवळ राजकीय परिषद होती, असा आरोप करत पुढील हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारादेखील पाटील यांनी दिला आहे. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

पत्रकार परिषदेबाबत माहिती देताना शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील

केंद्राचे साखर उद्योग धोरण, पुण्यात पार पडलेली साखर परिषद आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी सडकून टीका केली. आज पाटील यांनी शहरात पत्रकार परिषद घेऊन देशातील साखर उद्योग अडचणीत येणास केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच पुणे येथे पार पडलेल्या साखर परिषदेवर टीका करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राज्यातील साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत शेतकरी उपयोगी धोरण आणि त्यांच्या हितावर चर्चा न करता, याउलट शेतकऱ्यांना लुटण्यासाठी साखर कारखानदारांना सोबत येण्याचा एक प्रकारचा दबाव टाकण्याचे काम या परिषदेत झाले आहे.

ही साखर परिषद न होता राजकीय परिषद झाल्याची टीका यावेळी पाटील यांनी केली. तसेच नितीन गडकरी हे साखर कारखानदारांना ईथेनॉल निर्मिती करायला सांगतात. मात्र, नितीन गडकरी आणि त्यांच्या पक्षातील व युतीतील किती अमादार, खासदार तसेच मंत्री आपल्या साखर कारखाण्यात ईथेनॉल निर्मिती करतात? असा सवाल रघुनाथदादा पाटील यांनी गडकरींना केला आहे.

त्याचबरोबर रघुनाथदादा पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावरसुद्धा टीका केली. शरद जोशी यांच्या संघटनेतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी आमदार, खासदार झाले. या दहा वर्षात ३ टक्के साखरेच्या उताऱ्याची चोरी झाली आहे. यामध्ये शेट्टी सामील असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, साखर कारखानदार यांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीचे नुकसान केले असून पुढील हंगामात एफआरपी अधिक १ हजार दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यावेळी एकही साखर कारखाना, साखर आयुक्त कार्यालय सुरू होऊ देणार नसल्याचा इशारा, रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AV

Feed send file name - mh_sng_02_raghunath_patil_on_gadkari_vis_1_7203751

स्लग - मंत्री गडकरी आणि त्यांच्या पक्षाचे नेत्यांच्या एक तरी कारखाण्यात इथेनॉल निर्मिती सुरू आहे,का .? शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ..

अँकर - इथेनॉल वरून साखर कारखानदारांना इशारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.गडकरी आणि त्यांच्या पक्षाच्या एका तरी नेत्याच्या कारखान्यात ईथेनॉल सुरू आहे का ? असा सवाल केला आहे.तसेच पुण्यातील साखर परिषद ही शेतकरयांच्या हिताची नव्हे,तर केवळ राजकीय परिषद होती,असा आरोप करत पुढील हंगामात ऊस दरासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे.ते सांगली मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.Body:व्ही वो - केंद्राच्या साखर उद्योग धोरण, पुण्यात पार पडलेल्या साखर परिषद आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर प्रदेशाध्यक्ष नेते रघुनाथदादा पाटील यांनी सडकून टीका केली आहे.सांगलीत आज रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील साखर उद्योग अडचणीत येणास केंद्र सरकारचे धोरण जवाबदार असल्याचा आरोप केला आहे.तसेच पुणे येथे पार पडलेल्या साखर परिषदेवर टीका करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,मुख्यमंत्री,राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राज्यातील साखर कारखानदार यांच्या उपस्थितीत शेतकरी विरोधी धोरणावर आणि त्यांच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा होणे गरजेचे होते,मात्र तसे झाले नाही,याउलट शेतकरयांना लुटण्यासाठी साखर कारखानादारांना सोबत येण्याचा एक प्रकारचा दबाव टाकण्याचा काम झाले असून ही साखर परिषद न होता, राजकीय परिषद पार पडल्याची टीका यावेळी केली.तसेच नितीन गडकरी यांनी साखर कारखानादारांना इथेनॉल तयार करण्याबाबत दिलेल्या इशारयावर बोलताना,नितीन गडकरी आणि त्यांच्या पक्षातील अमादार,खासदार तसेच त्यांच्या युतीतील मंत्र्यांचे अनेक साखर कारखाने आहेत.पण त्यांच्या एकाही कारखान्यात ईथेनॉल सुरू आहेत का ? असा सवाल केला आहे.त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना शरद जोशी यांच्या संघटनेतुन बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी हे आमदार,खासदार झाले आणि या दहा वर्षात 3 टक्के साखरेच्या उताऱ्याची चोरी झाली आहे,यामध्ये शेट्टी सामील असल्याचा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी यावेळी केला आहे.तसेच साखर कारखानादार यांनी शेतकरयांचे एफआरपीचे नुकसान केले असुन पुढील हंगामात एफआरपी अधिक 1 हजार
दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून प्रसंगी एकही साखर कारखाने ,साखर आयुक्त कार्यालय सुरू होऊ देणार नाही,असा इशारा यावेळी रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहेConclusion:
Last Updated : Jul 10, 2019, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.