सांगली - आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या स्मरणार्थ आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आज शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - एनआरसी, सीएए कायद्याविरोधात सांगलीत महिलांची निदर्शने
शेतकरी विरोधी कायद्यामुळे धर्मा पाटील या शेतकऱ्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात विष पिऊन मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने व शेतकरी विरोधी धोरणामुळे धर्मा पाटील यांना आत्महत्या करावी लागली होती. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या स्मरणार्थ आणि शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आज शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा - 'मटणाच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा शेळ्यांवर डल्ला'
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकरी विरोधी कायदे राबविण्यात येत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरलेला नाही. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेती मालाला योग्य हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांच्या जमिनींना योग्य मोबदला द्यावा, अशा विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.