ETV Bharat / state

आला रे आला, आंबा आला; देवगडचा हापूस सांगलीत दाखल - देवगडचा हापूस सांगलीत दाखल

कोकणाबरोबर कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यातूनही आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल होत आहे. ज्यामध्ये शिक्रापूर हापूस, बदामी आंबा, पायरी, लालबाग या जातीच्या आंब्यांचा सामावेश आहे. या आंब्यांना प्रति डजनासाठी ४५० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

देवगडचा हापूस सांगलीत दाखल
देवगडचा हापूस सांगलीत दाखल
author img

By

Published : Feb 9, 2021, 1:30 PM IST

Updated : Feb 9, 2021, 2:23 PM IST

सांगली - फळांचा राजा आंबा बाजारपेठेत आता दाखल झाला आहे. कोकणचा आंबा ग्राहकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये पार पडलेल्या सौद्यात एक डझन देवगड हापूस आंब्याला ३ हजार ३५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे.

आला रे आला, आंबा आला; देवगडचा हापूस सांगलीत दाखल
देवगड हापूसला मिळाला उच्चांकी दर..सांगलीच्या बाजारपेठेत आता फळांचा राजा आंबा दाखल होऊ लागला आहे. हंगामाआधीच हापूस आंबा बाजारात दाखल झाल्यामुळे ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सोमवारी देवगड येथील शेतकरी अभय बेलकर या शेतकऱ्याने आपला हापूस आंबा सांगलीच्या विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला होता. यावेळी पार पडलेल्या सौदयात बेलकर यांच्या देवगड हापूस आंब्याला तब्बल ३ हजार ३५१ रुपये प्रति डझन इतका उच्चांकी दर मिळाला आहे. यंदा सुरवातीलाच आंब्याला चांगला दर मिळत असून यापुढेही चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा बेलकर यांनी व्यक्त केली आहे.कोकणाबरोबर कर्नाटकचा आंबा दाखल..कोकणाबरोबर कर्नाटक राज्यातील काही जिल्ह्यातूनही आंबा सांगलीच्या बाजारपेठेत दाखल होत आहे. ज्यामध्ये शिक्रापूर हापूस, बदामी आंबा, पायरी, लालबाग या जातीच्या आंब्यांचा सामावेश आहे. या आंब्यांना प्रति डजनासाठी ४५० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यंदा हंगामाआधी आंबा दाखल होत असल्यामुळेग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे. एप्रिलनंतर आंब्याच्या मागणीत वाढ होईल पण दर कमी अधिक असतील, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Feb 9, 2021, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.