ETV Bharat / state

"रद्दी" द्या अन् कोरोनाग्रस्तांना मदत करा; विट्यातील 'देशप्रेमी मंच'चा अभिनव उपक्रम - विटा शहर

'रद्दीतून मदतीची संधी' हा उपक्रम विट्यातील देशप्रेमी मंचकडून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत घरातील रद्दी, अडगळीत पडलेली पुस्तके मंचच्या सदस्यांच्याकडून घरोघरी जाऊन गोळा करण्यात येत आहेत. ज्यामुळे त्यांच्या घरातील रद्दीचा ढिगारा साफ होण्याबरोबर त्यांना कोरोनाग्रस्तांना मदतीची संधी मिळणार आहे. गोळा झालेली रद्दी विक्री करून त्यातून जमा होणारे पैसे हे कोरोनाग्रस्त व्यक्ती व कुटुंबांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे.

अभिनव उपक्रम
अभिनव उपक्रम
author img

By

Published : Jun 6, 2021, 4:15 PM IST

सांगली - कोरोनाच्या संकटात माणुसकीचा हात आज गरजेचा बनला आहे. प्रत्येकाने आपल्या परीने कुठेतरी समाजाच्या दायित्वाची भूमिका बजावणे आवश्यक बनले आहे. या जाणीवेतून विट्याच्या "देशप्रेमी मंच" या सामजिक संस्थेने "रद्दीतून मदतीची संधी" हा उपक्रम सुरू केला आहे. घरोघरी जाऊन रद्दी गोळी करून ती विक्री करत जमा होणारे पैसे कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

विट्यातील 'देशप्रेमी मंच'चा अभिनव उपक्रम

देशप्रेमींची कौतुकास्पद "रद्दी"मदत

विटा शहरातील 'देशप्रेमी मंच' कोरोना रुग्णांच्या मदतीला आता धावुन आला आहे. 'रद्दीतून मदतीची संधी' हा उपक्रम विट्यातील देशप्रेमी मंचकडून हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत घरातील रद्दी, अडगळीत पडलेली पुस्तके मंचच्या सदस्यांच्याकडून घरोघरी जाऊन गोळा करण्यात येत आहेत. ज्यामुळे त्यांच्या घरातील रद्दीचा ढिगारा साफ होण्याबरोबर त्यांना कोरोनाग्रस्तांना मदतीची संधी मिळणार आहे. गोळा झालेली रद्दी विक्री करून त्यातून जमा होणारे पैसे हे कोरोनाग्रस्त व्यक्ती व कुटुंबांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून संकलित होणारी जुनी शालेय पुस्तक व कादंबरी या गरजू विद्यार्थ्यांबरोबर कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना वाचनासाठी देण्यात येत आहेत.

'देशप्रेमी मंच'चा अभिनव उपक्रम
'देशप्रेमी मंच'चा अभिनव उपक्रम

रद्दीतून कोरोनाग्रस्तांना मदत

देशप्रेमी मंचच्या या उपक्रमाला विटा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेकजण देशप्रेमी मंचच्या या उपक्रमाला भरभरून मदत करत आहेत. संस्थेचे सदस्य गजानन बाबर व सिकंदर ढालाईत हे घरोघरी जावून ही रद्दी व पुस्तके गोळा करत आहेत. आतापर्यंत जवळपास 100 किलोहून अधिक रद्द व 200 हून अधिक पुस्तके जमा झाले आहेत. तसेच काहींकडून चेक स्वरुपात रक्कम मदत म्हणून दिली जात आहे.

संकटात मदत करण्याची अभिनव संधी

मदत करण्याची भावना असेल तर मदत कोणत्याही पातळीवर आणि कशीही करता येते आणि याचेच उदाहरण विट्याच्या 'देशप्रेमी मंच'ने राबवलेल्या उपक्रमातून पाहायला मिळत आहे. त्यामुळे "रद्दीतून मदतीची संधी" हा उपक्रम संकटातही मदत करता येते, असा संदेश देणारा आहे, असेच म्हणावे लागले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.