ETV Bharat / state

दिल्ली सोने तस्करी प्रकरण : 'एनआयए'चे सांगलीतील खानापूर तालुक्यात छापे

या कारवाईबाबत सांगली पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता एनआयएच्या जिल्ह्यातील टाकण्यात आलेल्या छापे कारवाईला दुजोरा देत पथकाकडून खानापूर तालुक्यातल्या जाधववाडी या ठिकाणी छापे टाकण्यात आलेली आहेत. त्या पथकाला सांगली पोलीस दलाकडून दोन पथके मदतीसाठी देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, त्याची तपशील गुप्त असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली आहे.

delhi gold smuggling case nia raids in khanapur taluka at sangli district
'एनआयए'चे खानापूर तालुक्यात छापे
author img

By

Published : Oct 29, 2020, 10:32 PM IST

सांगली - जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यामध्ये दिल्लीतील सोने तस्करी प्रकरणी एनआयएकडून छापे टाकण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये 83 किलो सोने तस्करी करताना खानापूर-आटपाडी तालुक्यातल्या आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या तस्करी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आला होता. एनआयएकडून सांगली पोलिसांच्या मदतीने खानापूर तालुक्यातील जाधववाडी याठिकाणी छापा टाकत चौकशी करण्यात आली आहे.

दोन महिन्यापूर्वी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर सोने तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी 83 किलो सोन्याची बिस्किटे डीआरआयने (महसूल गुप्तचर संचालनालय) जप्त केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेले आठ जण ही सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील असल्याचे समोर आले होते. रवीकिरण गायकवाड, पवन कुमार गायकवाड, योगेश हणमंत रुपनर, अभिजित बाबर, सद्दाम पटेल, अवधूत अरुण विभूते, सचिन आप्पासो हसबे, दिलीप लक्ष्मण पाटील या आरोपींची समावेश आहे. दरम्यान तपासामध्ये आसाम राज्यातील गुवाहाटीवरून बोगस आधारकार्डद्वारे प्रवास करून दिल्लीमध्ये आल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्याने,त्या तस्करीचा तपास हा राष्ट्रीय तपास एजन्सीकडे देण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्यावर युएपीए या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.तर या सोने तस्करी प्रकरणी "एनआयए" कडून सांगली जिल्ह्यामध्ये एक महिन्यापूर्वी दिघंची या ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर गुरुवारी खानापूर तालुक्यातल्या जाधववाडी याठिकाणी पुन्हा छापे टाकले आहेत आणि या ठिकाणी काही लोकांची एनआयएच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान या कारवाईबाबत सांगली पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधला असता एनआयएच्या जिल्ह्यातील टाकण्यात आलेल्या छापे कारवाईला दुजोरा देत पथकाकडून खानापूर तालुक्यातल्या जाधववाडी या ठिकाणी छापे टाकण्यात आलेली आहेत. त्या पथकाला सांगली पोलीस दलाकडून दोन पथके मदतीसाठी देण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, त्याची तपशील गुप्त असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.