ETV Bharat / state

पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच भरीव पॅकेज देण्याचा निर्णय -विश्वजित कदम

राज्यात महापूरामुळे विशेषतः कोकण विभाग आणि सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठे पॅकेज दिले जाईल, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम
author img

By

Published : Jul 31, 2021, 8:39 PM IST

सांगली - राज्यात महापूरामुळे विशेषतः कोकण विभाग आणि सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठे पॅकेज दिले जाईल, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच भरीव पॅकेज देण्याचा निर्णय होईल, अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

'शेतीला भरीव पॅकेज जाहीर होईल'

कोकण, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शेतीला मोठया प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे पुरबाधित शेतकऱ्यांना अधिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषी मंत्री आणि आपण अशी, चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर बैठकीत चर्चा केली आहे. ज्यामध्ये शेतीच्या नुकसानीबाबत सखोल चर्चा झाली आहे. आद्यपही काही भागात पुराचे पाणी ओसरले नसल्याने, पंचनामे सुरू आहेत. त्यासाठी इतर तालुक्यातील कृषी अधिकारीही त्याठिकाणी दाखल झाले आहेत. त्यामुळे हे सर्व पंचनाम्यांचा अहवाल पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री हे मंत्री मंडळाच्या बैठकीत इतर पूरग्रस्तांसह शेतीलाही प्राधान्य देतील असा विश्वास मंत्री कदम यांनी व्यक्त केला. दरम्यान, पूर बाधित होणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांनी विजेचे ट्रान्सफार्मची उंची वाढवण्याची केलेली मागणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मान्य करत, वीज वितरण विभागाला याबाबचा अहवाल देण्याच्या सूचना केल्याचे सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.