ETV Bharat / state

लॉजवर आढळला तरूणीचा मृतदेह, प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय

येथील एका लॉजवर तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.

author img

By

Published : Oct 10, 2019, 9:41 PM IST

Updated : Oct 10, 2019, 10:13 PM IST

लॉज

सांगली - येथील एका लॉजवर तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचे अंदाज व्यक्त होत आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

सांगली शहरातील एसटी स्टँड परिसरात असणाऱ्या टुरिस्ट लॉजवर एका महिलेचा खून झाल्याचा उघडकीस आला आहे. वैशाली अर्जुन सूर्यवंशी असे, या तरुणीचे नाव आहे. आज (बुधवार) सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. लॉजमधील एका रूममध्ये ही तरुणी मृत अवस्थेत आढळून आली. यानंतर लॉज कर्मचऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांच्यासह पथकाने धाव घेत पंचनामा केला. तर वैशाली हिचा रुमालाने गळा आवळून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे, अशी माहिती शहर पोलीस निरीक्षक शिंदकर यांनी दिली आहे. मात्र, खुनाचे कारण हे अद्याप अस्पष्ट असून, प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.

Intro:
File name - mh_sng_03_murder_vis_01_7203751 - mh_sng_03_murder_byt_04_7203751

स्लग - गळा आवळून तरुणीचा खून, लॉजवर आढळला मृतदेह...

अँकर - सांगली मध्ये एका तरुणीचा खून झाला आहे.एका लॉजवर गळा आवळून हा खून करण्यात आला आहे.नेमका हा खून कोणत्या कारणातून झाला,हे स्पष्ट होऊ शकले नाही,मात्र प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचं अंदाज व्यक्त होत आहे. Body:सांगली शहरातील एसटी स्टँड येथे असणाऱ्या टुरिस्ट लॉजवर एका महिलेचा खून झाल्याचा उघडकीस आला आहे.वैशाली अर्जुन सूर्यवंशी असे ,या तरुणीचे नाव आहे.आज बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.लॉज मधील एका रूम मध्ये ही तरुणी मृत अवस्थे आढळून आली, यानंतर लॉज कर्मचरयांनी सदरची माहिती पोलिसांना देताच तातडीने घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांच्यासह पथकाने धाव घेत पंचनामा केला.तर रुमालाने वैशाली हिचा गळा आवळून खून करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक अजय शिंदकर यांनी दिली आहे.मात्र खुनाचे कारण हे अद्याप अस्पष्ट असून, प्रमेप्रकरणातुन हा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

बाईट - अजय शिंदकर - पोलीस निरीक्षक, सांगली शहर.Conclusion:
Last Updated : Oct 10, 2019, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.