सांगली - महाराष्ट्राला आज यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची गरज असून समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत वज्रमूठ आवळली पाहिजे,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच मी नास्तिक असल्याचे सांगत राजकारण्यांनी मोजून मापून बोलावं लागते, नाही तर दिवसभर चव्हाण साहेबांच्या समाधीवर बसावे लागतंय, हे आपण अनुभवल्याची आठवण ही अजित पवारांनी काढली. मिरज मध्ये पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात वज्रमूठ आवळा - उपमुख्यमंत्री अजित पवार - मिरज यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार सोहळा
महाराष्ट्रातील आणि देशातील सामाजिक वातावरण बघितलं, तर आज महाराष्ट्राला यशवंत विचारांची गरज आहे. जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करत आहेत. या मंडळींना वेळीच रोखले पाहिजे यासाठी समाजाला जागृत करण्याची गरज असून त्यासाठी यशवंत विचार गरजेचे आहे, तसेच या विचारांना पुढे नेऊन,नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करावे लागणार आहे. यातूनच समाजात दरी निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळली पाहिजे,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.