ETV Bharat / state

अतिवृष्टीचा डाळिंबाला फटका, फळपिक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी

author img

By

Published : Oct 24, 2020, 3:54 PM IST

अतिवृष्टीचा सांगली जिल्ह्यातल्या शेतीला फटका बसला आहे. हजारो हेक्टर डाळिंबाची शेती बाधित होऊन सुमारे 300 कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. त्यामुळे फळपिक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. मात्र विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी जाचक अटी असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

pomegranate fields
अतिवृष्टीचा डाळिंब शेतीला फटका

सांगली - अतिवृष्टीचा सांगली जिल्ह्यातल्या शेतीला फटका बसला आहे. हजारो हेक्टर डाळिंबाची शेती बाधित होऊन सुमारे 300 कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. राज्य सरकारने हेक्टरी 25 हजारांची मदत जाहीर केली. ही मदत शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. मात्र शेतकरी आता पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. पीक विमा भरपाई जाचक निकषांच्या कचाट्यात अडकल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपताना दिसत नाहीये.

अतिवृष्टीचा डाळिंब शेतीला फटका

डाळिंबाचे आगार म्हणून सांगली जिल्ह्याच्या आटपाडीची ओळख आहे. याशिवाय जत, कवठेमहांकाळ आणि खानापूर या दुष्काळी भागातही डाळिंबाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीचा फटका या डाळिंबाच्या शेतीला बसला आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान यामध्ये झाले आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गीक संकटात मदत मिळावी म्हणून, राज्य शासनाची फळपिक विमा योजना आहे. मात्र सध्या शेतकरी संकटात सापडला असतानाही, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जाचक अटी असल्याने शेतकरी विम्यापासून वंचित राहात असल्याचे पाहायला मिळत आहे. या जाचक अटी रद्द करून, शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.