ETV Bharat / state

सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग सर्व प्रक्रिया पार पाडून सांगलीत दारू विक्री; तब्बल दोन किलोमीटरपर्यंत तळीरामांच्या रांगा

पहिल्याच दिवशी दारू दुकाने उघडल्यानंतर नागरिकांची गर्दी आणि दारू घेण्यासाठी वाद होऊ नये, यासाठी सांगलीत पोलिसांनी दारू दुकानाच्या परिसरात बंदोबस्त ठेवला होता.

crowds of citizens outside liquor stores sangli
सांगलीत दारू विक्री दोन किलोमीटरपर्यंत तळीरामांच्या रांगा
author img

By

Published : May 5, 2020, 3:36 PM IST

सांगली - जिल्ह्यामध्ये सोमवारपासून दारू विक्रीला सुरुवात झाली. सकाळी दारूची दुकाने उघडताच तळीरामांनी दुकानासमोर एकच गर्दी केली होती. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंचे पालन करत तळीरामांनी रांगेत उभे राहून दारू खरेदी केली.

सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्क्रिनिंग सर्व प्रक्रिया पार पाडून सांगलीत दारू विक्री...

हेही वाचा... दारूसाठी दुसऱ्या दिवशीही नागरिकांची गर्दी; कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात विक्री सुरु

सांगली शहरातील अनेक दारू दुकानांसमोर दारू खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी दहा वाजता दारूची दुकाने उघडण्यात आली. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात ठिकठिकाणी दारू विक्रीला सुरुवात झाली. बघता बघता दारू खरेदीसाठी तळीरामांचा रांगाच्या रांगा दुकानासमोर लागल्या होत्या. विश्रामबाग येथील दारू दुकानासमोर तर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत रांगलागली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.