ETV Bharat / state

सांगलीत विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपच्या गोटात गटबाजी - विलासराव जगताप

जत तालुक्यात भाजपच्या उमेदवारीवरून आमदार आणि तालुक्यातील भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे. उमेदवारी ठरवण्याचा आमदार विलासराव जगतापांना अधिकारच काय? असा सवाल जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती व जत तालुक्याचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सांगलीत उमेदवारी वरून भाजपच्या गोटात गटबाजी
author img

By

Published : Jul 21, 2019, 11:27 AM IST

Updated : Jul 21, 2019, 3:34 PM IST

सांगली - जत तालुक्यात भाजपच्या उमेदवारीवरून आमदार आणि तालुक्यातील भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे. उमेदवारी ठरवण्याचा आमदार विलासराव जगतापांना अधिकारच काय? असा सवाल जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती व जत तालुक्याचे नेते तमनगौडा रवी पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच तालुक्यातील भाजपची उमेदवारी बदलली जाईल आणि या निवडणुकीसाठी आपणही इच्छुक असल्याची भूमिका सभापती पाटील यांनी स्पष्ट केली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सांगलीत विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपच्या गोटात गटबाजी

आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात जत तालुक्यातील भाजप नेते व जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील आणि भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडगी आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार आरोप केले आहेत. पाच वर्ष आमदार जगताप यांनी तालुक्यात भाजपचे कोणतेही संघटन केले नाही. याउलट तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक, नगरपालिका ग्रामपंचायत भाजपच्या हातातून निसटल्या. ज्या तीन मुद्द्यांवर आमदार जगताप यांनी निवडणूक लढवली. त्या जनतेच्या पाण्याचा प्रश्न, जत तालुका विभाजन आणि रस्त्यांचा प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सोडवला नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. तर तालुक्यात रखडलेली म्हैसाळ सिंचन योजना खासदार संजयकाका पाटील यांच्यामुळे गतिमान झाली. पण तालुक्याचे आमदार म्हणून जगताप यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केले नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये जगतापांच्या विरोधात प्रचंड रोष असून पक्षश्रेष्ठींकडे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जगताप यांच्या ऐवजी अन्य उमेदवार देण्याची मागणी तालुका भाजपकडून करण्यात आल्याची माहिती यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडगी आणि पदाधिकाऱ्यांनी दिली.

तर दोन दिवसांपूर्वी विलासराव जगताप यांनी आपणच भाजपचे विधानसभेचे उमेदवार असणार असे जाहीर केले आहे. यावरून बोलताना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी भाजप शिस्तप्रिय पक्ष असून या ठिकाणी उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष आणि पक्ष नेतृत्वाला आहे. त्यामुळे आपली उमेदवारी ठरवण्याचा जगतापांना अधिकार काय? आणि पाच वर्षात त्यांनी तालुक्यात काय विकास केला आहे? असा सवाल करत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आपणही उमेदवारी मागितली असून पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भूमिका जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी स्पष्ट केली आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

AVBB

FEED SEND FILE NAME- mh_sng_04_bjp_crisis_vis_1_7203751 - to - mh_sng_04_bjp_crisis_vis_byt_3_7203751

स्लग - उमेदवारीवरून भाजपा आमदार आणि नेत्यांन मध्ये जुंपली, स्वतःची उमेदवारी ठरवण्याचा आमदार जगतापांना अधिकार काय ? सभापती तमनगौडा रवीपाटील

अँकर - जत तालुक्यात भाजपाच्या उमेदवारीवरून आमदार आणि तालुक्यातील भाजपाच्या नेत्यांच्या मध्ये जुंपली आहे.उमेदवारी ठरवण्याचा आमदार विलासराव जगतापांना अधिकारचं काय ? असा सवाल जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती व जत तालुक्याचे नेते तमनगौडा रवीपाटील यांनी उपस्थित केला आहे.तसेच तालुक्यातील भाजपाची उमेदवारी बदलली जाईल,आणि या निवडणुकीसाठी आपणही इच्छुक असल्याची भूमिका सभापती पाटील यांनी स्पष्ट केली आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Body:व्ही वो - सांगलीच्या जत विधानसभा मतदारसंघात भाजपा मध्ये आता जुंपली आहे.आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात जत तालुक्यातील भाजपा नेते व जिल्हा परिषद आरोग्य शिक्षण सभापती तमनगौडा रवीपाटील आणि
भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडगी आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार
आरोप केले आहेत.पाच वर्ष आमदार जगताप यांनी तालुक्यात भाजपाचे कोणतेही संघटन केलं नाही,याउलट तालुक्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँक ,नगरपालिका ग्रामपंचायत भाजपाच्या हातातून निसटल्या,ज्या तीन मुद्द्यांवर आमदार जगताप यांनी निवडणूक लढवली,त्या जनतेच्या पिण्याचा प्रश्न,जत तालुका विभाजन आणि रस्त्यांचा प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सोडवला नाही, त्यामध्ये अयशस्वी ठरले,असा आरोप यावेळी करण्यात आला.तर तालुक्यात रखडलेल्या म्हैसाळ सिंचन योजना खासदार संजयकाका पाटील यांच्या झाल्यामुळे गतिमान झाल्या,पण तालुक्याचे आमदार म्हणून जगताप यांनी त्यांची जबाबदारी पूर्ण केले नाही, त्यामुळे तालुक्यातील जनतेमध्ये जगतापांच्या विरोधात प्रचंड रोष असून पक्षश्रेष्ठींच्या कडे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जगताप यांच्या ऐवजी अन्य उमेदवार देण्याची मागणी तालुका भाजपकडून करण्यात आल्याची माहिती यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडगी आणि पदाधिकाऱ्यांनी दिली.
तर दोन दिवसांपूर्वी विलासराव जगताप यांनी आपणच भाजपाचे विधानसभेचे उमेदवार असणार असल्याचे जाहीर केले आहे,यावरून बोलताना जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवीपाटील यांनी भाजपा शिस्तप्रिय पक्ष असून या ठिकाणी उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष आणि पक्ष नेतृत्वाला आहे त्यामुळे आपली उमेदवारी ठरवण्याचा जगतापांना अधिकार काय आणि पाच वर्षात त्यांनी तालुक्यात काय विकास केला आहे ? असा सवाल करत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून आपणही उमेदवारी मागितली असून पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे भूमिका जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवीपाटील यांनी स्पष्ट केली आहे.

बाईट - तमनगौडा रवीपाटील - सभापती, जिल्हा परिषद ,सांगली.

बाईट - चंद्रकांत गुडडगी - तालुकाध्यक्ष, भाजपा,जत.Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 3:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.