सांगली- काल कणेगाव चेकपोस्ट ओलांडून एक तरुण बेळगावला जात होता. मात्र, कोल्हापूर पोलिसांनी तरुणाला वाठार येथून ताब्यात घेतले व त्याला सांगलीतील कुरळप पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
संशयित तरुण काल एका मोटारसायकलने कणेगाव चेकपोस्ट ओलांडून कोल्हापूरच्या वाठारपर्यंत गेला होता. वाठार येथील ए.टी.एममधून पैसे काढून बाहेर पडताच या तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. विचारपूस केल्यानंतर तरुण हा बेळगाव येथील रहिवाशी असून तो मुंबई कांदिवली येथील कॅफेमध्ये काम करत होता. मात्र, त्याचा पगार व खाण्याचे वांदे झाल्याने तो तीन दिवसापूर्वी मिळेल त्या गाडीने तर कधी चालत बेळगावकडे जात असल्याचे समजले.
सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी या तरुणाला जेवण दिले व गाडीतून पुन्हा कणेगाव चेकपोस्टवर सोडून दिले. त्यानंतर, कुरळप आरोग्य कर्मचाऱ्यांनी या तरुणाची थर्मल स्कॅनिंग केली. त्यात तरुणाचे तापमाण जास्त असल्याने त्याला पुढील तपासणीसाठी रुग्णवाहिकेने मिरज रुग्णालयात पाठवण्यात आले.
हेही वाचा- लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत; पैशांविना मशागती खोळंबल्या