ETV Bharat / state

कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयातच केली आत्महत्या.. सांगलीतील घटना

author img

By

Published : Sep 28, 2020, 4:25 PM IST

मिरजेच्या सरकारी रुग्णालयात एका कोरोनाबाधित रुग्णाने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही, पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

corona patient committed suicide
सांगलीत कोरोनाबाधिताची आत्महत्या

सांगली - एका कोरोनाबाधित रुग्णाने गळा कापून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. हुसेन बाबुमिया मोमीन,असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही, मात्र नातेवाइकांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सांगलीत कोरोनाबाधिताची आत्महत्या
मिरज शहरातल्या मालेगाव रस्त्यावरील अमननगर येथील हुसेन बाबूनिया मोमीन (वय वर्ष 56) या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना दहा दिवसांपूर्वी मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्या ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून हुसेन यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हुसेन मोमीन यांनी रुग्णालयात चाकूने आपला गळा कापून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून मोमीन यांच्या नातेवाईकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेऊन रुग्णालय प्रशासनावर उपचार केले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच ते आत्महत्या करू शकत नाहीत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा नातेवाइकांनी केली आहे.

मिरज शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर ननंदकर यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा देत, सदर घटनेच्या बाबतीत रुग्णालय प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, त्या आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याची माहिती डॉ. सुधीर ननंदकर यांनी दिली आहे.

तर, हुसेन मोमीन यांनी नेमकी कोणत्या करणातून आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकले नसून, या आत्महत्येची नोंद मिरज शहर पोलीस ठाण्यांमध्ये झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.