सांगली - महाराष्ट्र आणि केरळ राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाश्यांवर कर्नाटक सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्नाटकच्या कागवड या ठिकाणी चेक पोस्ट सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट सुरू, तपासणीनंतर कर्नाटकमध्ये प्रवेश
ज्या प्रवाश्यांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून येत आहेत. तसेच ज्या प्रवाश्यांनी कोरोनाच चाचणी केली नाही, अशा संशयास्पद प्रवाश्यांना कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यात बंदी घातली असल्याचे कागवड आरोग्य विभागाचे हेल्थ ऑफिसर जे.डी.मुजावर यांनी सांगितले.