सांगली - जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पडणाऱ्या पाऊसामुळे चांदोली धरण 99.86 टक्के भरले आहे. 34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात सध्या 34.36 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. तर धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून 2,300 क्यूसेक पाण्याचा वारणा नदीत विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
संततधार पावसाने चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरले चांदोली धरण जवळपास भरले..सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे चांदोली धरण जवळपास भरले आहे. 34.40 टीएमसी इतके धरणाची पाणी साठवण क्षमता आहे. मात्र अतिवृष्टी होत असल्याने चांदोली धरण जवळपास भरले आहे. 34.36 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला आहे. एक जूनपासून शिराळा तालुक्यात एक हजार 486 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात 16 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. मोठ्या प्रमाणात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाच्या पाण्याची आवक होत असल्याने धरण 99.86 टक्के भरले आहे. तर पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीपात्रामध्ये 2,300 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत थोडी वाढ होत आहे. हे ही वाचा - धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गर्भवती राहल्याने केली आत्महत्या