ETV Bharat / state

महापुराच्या धास्तीत असलेल्या सांगलीकरांना दिलासा..! पाणी ओसरायला सुरुवात

कृष्णा नदीने 51 फूट पातळी ओलांडली आहे. मात्र नद्यांच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीने वाढ सुरू आहे. कृष्णा नदी, कोयना धरण आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर सांगली जिल्ह्यात सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे.

author img

By

Published : Jul 24, 2021, 7:49 PM IST

सांगलीकरांना दिलासा
सांगलीकरांना दिलासा

सांगली - सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. मात्र सकाळपासून जिल्ह्यात आणि वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाने उघडीप दिला आहे. तर कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. सांगलीत वाढणारी पाण्याची पातळी 52 फूटांवर जाऊन स्थिर होऊन सायंकाळी नंतर ओसरू लागेल, असे पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापुराच्या धास्तीत असलेल्या सांगलीकरांना दिलासा..!

कृष्णा आणि वारणेला महापूर
संततधार पाऊस आणि चांदोली व कोयना धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. यामुळे वारणा व कृष्णा काठच्या 100 हून अधिक गावात पुराचे पाणी शिरले आहे. आतापर्यंत 10 हजारहून अधिक कुटुंबाचे आणि 25 हजारांहून अधिक जनावरांचे स्थलांतर झाले आहे. ज्या गावांना पुराचा वेढा पडला आहे, त्या ठिकाणी एनडीआरएफ आणि प्रशासनाच्या वतीने बचावकार्य करत नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात 3 एनडीआरएफची पथके कार्यरत आहेत. त्याचबरोबर सैन्य दलालाही पाचारण करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सांगली शहराच्या बाजारपेठ आणि पूर पट्ट्यातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक दुकानं आणि घरं ही पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणच्या नागरिकांनी या आधीच स्थलांतर केलं आहे.

सायंकाळनंतर पाणी ओसरणार -
सध्या कृष्णा नदीने 51 फूट पातळी ओलांडली आहे. मात्र नद्यांच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीने वाढ सुरू आहे. कृष्णा नदी, कोयना धरण आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. तर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. तर सांगली जिल्ह्यात सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून सध्या 3 लाख 50 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाण्याची पातळी सायंकाळपर्यंत 52 फुटांवर जाऊन स्थिर होईल आणि त्यानंतर पाणी ओसरू लागेल, असं सांगली पाटबंधारे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कृष्णा आ-णि वारणा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - Maharashtra Flood: राज्यात अतिवृष्टीमुळे 76 जणांचा मृत्यू, 59 जण अद्याप बेपत्ता, आतापर्यंत 90 हजार लोकांना वाचवले

हेही वाचा - मृत्यूची दरड : स्वप्नांची राखरांगोळी झाल्यानं नागरिकांचा आक्रोश, अनेक कुटुंब उद्ध्वस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.