ETV Bharat / state

काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात निदर्शने, मोदींचा शपथविधी देशासाठी 'काळा दिवस' असल्याची टीका - सांगली

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करत मोदींचा शपथविधीचा दिवस म्हणजे 'देशासाठी काळा दिवस' असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

पंतप्रधान मोदींच्या सात वर्षाच्या कार्यकाळाचा काँग्रेसने निदर्शने करून नोंदवला निषेध..

author img

By

Published : May 30, 2021, 5:42 PM IST

सांगली - केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. सांगली जिल्हा काँग्रेसकडूनन मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करत मोदींचा शपथविधीचा दिवस म्हणजे 'देशासाठी काळा दिवस' असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

काँग्रेसकडून केंद्र सरकारविरोधात निदर्शने, मोदींचा शपथविधी 'देशासाठी काळा दिवस' असल्याची टीका

'अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारने या देशाला भकास केले'

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. सात वर्षाच्या कार्यकाळात देशातील जनतेची लूट मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. अच्छे दिनच्या नावाखाली मोदी सरकारने या देशाला भकास केले, असा आरोप करत सांगली काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. शहरातील काँग्रेस भवनाच्या परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

'सात वर्षात मोदींकडून देश भकास'

मोदी सरकारने घेतलेल्या सात निर्णयाचे प्रतिकात्मक पुतळे बनवून त्याला यावेळी काळे फासण्यात आले. देशातील कोरोनाला मोदी सरकार जबाबदार असून, या सरकारने संपूर्ण देश स्मशानभूमी बनवून टाकला आहे. महागाईने कळस गाठला आहे. तसेच, पेट्रोलने आता शंभरी पार केली आहे. त्यामुळे हे सरकार कोणत्याही पातळीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देऊ शकलं नाही. या सर्व पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि युवक नेते विशाल पाटील यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.