ETV Bharat / state

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ढोल वादन आंदोलन, अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी आर्थिक तरतुदीची केली मागणी - ncp congress agitation

पालिकेकडून शिंदे मळा या ठिकाणी अहिल्यादेवी यांचा पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अद्याप या ठिकाणी पुतळा उभारण्याची कोणतीच कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. यामुळे आज काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ढोल वादन आंदोलन
author img

By

Published : Jul 24, 2019, 9:05 PM IST

सांगली - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, या मागणीसाठी आज पालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. तसेच, ढोल वाजवून आंदोलन केले.

सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे ढोल वादन आंदोलन

पालिकेकडून शिंदे मळा या ठिकाणी अहिल्यादेवी यांचा पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, अद्याप या ठिकाणी पुतळा उभारण्याची कोणतीच कार्यवाही सुरू करण्यात आली नाही. तसेच हा पुतळा उभारण्यासाठी पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. याचा निषेध करण्यासाठी आज पार पडलेल्या अर्थसंकल्पीय महासभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेवर मोर्चा काढला. तसेच धनगर समाजाचे पारंपारिक ढोल वादन करुन प्रशासन आणि पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा या प्रश्नाकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला.

नगरसेवक मनोज सरगर आणि वर्षा निंबाळकर यांनी या अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक व धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. आज पार पडलेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी तातडीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही, तर पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

Avb

Feed send file name - mh_sng_04_mnp_andolan_use_redy_1_7203751

स्लग - अहिल्यादेवी होळकरयांचा पुतळयासाठी आर्थिक तरतूद करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केले,ढोल वादन आंदोलन..

अँकर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यासाठी आर्थिक तरतुद करण्याच्या मागणीसाठी आज पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या नेर्तृत्वाखाली महापालिके मोर्चा काढून ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले आहे.अर्थसंकल्पीय महासभेच्या धर्तीवर हे आंदोलन करण्यात आले.Body:सांगली महापालिकेकडून सांगली महापालिका क्षेत्रातील शिंदे मळा या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची तरतूद करण्यात आली होती.मात्र अद्याप या ठिकाणी पुतळा उभारण्याची कोणतीच कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.तर हा पुतळा उभारण्यासाठी सांगली महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी निधीची तरतूद करण्यात आली नाही. याचा निषेध करण्यासाठी सांगली महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे धनगर समाजाने आज महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले.आज पार पडलेल्या अर्थसंकल्पीय महासभेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेवर मोर्चा काढून पालखीच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी धनगर समाजाचे पारंपारिक ढोल वादन करून प्रशासनाला आणि पालिकेच्या सत्ताधारी भाजपाला जागे करण्याचा प्रयत्न केला.नगरसेवक मनोज सरगर आणि वर्षा निंबाळकर यांनी या अनोख्या आंदोलनाचे आयोजन केले होते,यावेळी नगरसेवक अभिजित भोसले यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक व धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.आज पार पडलेल्या महासभेच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.सांगली महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी तातडीने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली नाही,तर पालिके विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी काँग्रेस -राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दिला आहे.

बाईट - मनोज सरगर - नगरसेवक, काँग्रेस, सांगली महापालिका.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.