ETV Bharat / state

सांगलीत भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, तीन ठिकाणी दगफेक - ST stand sangli

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बुधवारी (दि. 29 जानेवारी) भारत बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी सांगली शहरात प्रतिसाद मिळाला तर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला. तीन ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी रॅलीही काढण्यात आली होती.

रॅलीत सहभागी सांगलीकर
रॅलीत सहभागी सांगलीकर
author img

By

Published : Jan 30, 2020, 10:37 AM IST

सांगली - केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्च्याच्या सांगली जिल्हा बंदला बुधवारी (दि. 29 जानेवारी) संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर सांगली शहरात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला, तरी व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला होता. यामुळे वादावादी आणि तीन ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले आहेत. तर बंदच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये भव्य रॅली काढत जाचक कायदे रद्दची मागणी करण्यात आली आहे.

रॅलीत सहभागी सांगलीकर

बहुजन क्रांती मोर्चाकडून बुधवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाकेला सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर सांगली शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे सांगली मिरजेसह जिल्ह्यातील व्यापार पेठा बंद राहिल्याने व्यवहार ठप्प झाले होते. तर या बंदला काही व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू असल्याने सकाळी व्यापारी आणि आंदोलकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये तीन ठिकाणी दगडफेकीचे प्रकार ही घडले.

हेही वाचा - ब्रम्हनाळचे पूरग्रस्त मदतीपासून वंचितच.. गावकऱ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बहुजन क्रांती मोर्चाकडून या बंदच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एसटी स्टॅण्डजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रमुख मार्गावरून स्टेशन चौक पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅली मध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. या मोर्च्यात मुस्लीम समाजाची संख्या लक्षणीय होती.

हेही वाचा - सांगलीत भारत बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून रिक्षावर दगडफेक

एनआरसी व सीएए कायदा रद्द करण्यात यावे, अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. स्टेशन चौक येथे जाहीर सभेने या मोर्चाची सांगता झाली. यावेळी सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने सर्वसामान्य आणि विशेषतः मुस्लीम समाजाला जाचक असणारा हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहेत. मात्र, केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. तर या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच जेलभरो आंदोलनही करण्यात येईल, असा इशारा यावेळी बहुजन क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. बहुजन क्रांती मोर्चाचे निमंत्रक राजेंद्र कवठेकर आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आला होता.

हेही वाचा - सांगली जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा, स्वप्निल जोशीला उत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार

Intro:
File name - mh_sng_02_nrc_aginest_rayli_ready_to_use_7203751 -

बातमी रेडी to युज फॉरमॅट मध्ये आहे.

स्लग - NRC व CAA कायद्या विरोधात सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद,रॅली काढता कायदे रद्दची मागणी,बंद दरम्यान तीन ठिकाणी दगडफेक....

अँकर : केंद्र सरकारने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्याविरोधात बहुजन क्रांती मोर्च्याच्या सांगली जिल्हा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. तर सांगली शहरात या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असला,तर व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला होता.यामुळे वादावादी आणि तीन ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले आहेत.तर बंदच्या पार्श्‍वभूमीवर सांगली मध्ये भव्य रॅली काढत जाचक कायदे रद्दची मागणी करण्यात आली आहे.

Body:बहुजन क्रांती मोर्चा कडून आज भारत बंदची हाक देण्यात आली होती.या बंदच्या हाकेला सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.तर सांगली मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.यामुळे सांगली मिरजेसह जिल्ह्यातल्या व्यापार पेठा बंद राहिल्याने व्यवहार ठप्प झाले होते. तर या बंदलया व्यापारी संघटनांनी विरोध दर्शवला होता.त्यामुळे काही ठिकाणी दुकाने सुरू असल्याने सकाळी व्यापारी आणि आंदोलकांच्या मध्ये वादावादीचे प्रकार घडले. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये तीन ठिकाणी दगडफेकीचे प्रकार ही घडले.तर बहुजन क्रांती मोर्चाकडून या बंदच्या पार्श्वभूमीवर सांगली मध्ये रॅली आयोजित करण्यात आला होता.शहरातील बस स्टँड वरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून प्रमुख मार्गावरून स्टेशन चौक पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.आणि या रॅली मध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता.यामोर्च्यात मुस्लिम समाजाची संख्या लक्षणीय होती. एनआरसी व
सीएए कायदा रद्द करण्यात यावे,अशी जोरदार मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली.स्टेशन चौक येथे जाहीर सभेने या मोर्चाची सांगता झाली.यावेळी सर्वच नेत्यांनी केंद्र सरकारने सर्वसामान्य आणि विशेषत मुस्लिम समाजाला जाचक असणारा हा कायदा रद्द करावा अशी मागणी करत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहेत,मात्र केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही.तर या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल,आणि जेलभरो आंदोलन हा टप्पा असेल,असा इशारा यावेळी बहुजन क्रांती मोर्चा कडून देण्यात आला आहे बहुजन क्रांती मोर्चा चे निमंत्रक राजेंद्र कवठेकर आणि दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतिश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आला होता.

बाईट -संगीता शिंदे - नेत्या,बहुजन क्रांती मोर्चा,सांगली.

बाईट - सतीश मोहिते - जिल्हाध्यक्ष, बहुजन क्रांती मोर्चा,सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.