सांगली - राज्यातील आशावर्कर व गट प्रवर्तक महिलांच्या कर्मचाऱ्यांच्या 156 कोटींच्या मानधन वाढीचा अध्यादेश काढण्यात आला आहे. तो उद्यापर्यंत निघेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आशा कर्मचाऱ्यांना दिले. नऊ दिवसांपासून राज्यातल्या आशा वर्कर मानधन वाढीच्या मागणीसाठी बेमुदत संपावर आहेत.
गेल्या नऊ दिवसांपासून राज्यात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जिल्ह्यातल्या आशा वर्कर महिला कर्मचार्यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिला कर्मचारी शिष्टमंडळाची भेट घेऊन महाराष्ट्रामधील सत्तर हजार आशा महिलांसाठी 156 कोटी रुपये वेतानामध्ये वाढ केली आहे. त्याचा अध्यादेश काढण्यात आला आहे, तो उद्यापर्यंत निघेल असे आश्वासन महिला कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. यानंतर पलूसमध्ये सुमारे दीड हजार आशांची व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांची जाहीर सभा झाली. यामध्ये मुख्यमंत्री यांनी 156 कोटी रुपये वाढ केल्याबद्दल मुख्यमंत्री यांचे आभार मानले, यानंतर बोलताना कॉ. सुमन पुजारी यांनी सांगितले की, यामुळे प्रत्येक आशाला दरमहा कमीतकमी दोन हजार रुपये वाढ मिळणार आहे.