इस्लामपूर - येथील लक्ष्मी-नारायण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना रद्द करून कोविड सेंटर बंद करावे, या मागणीचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसिलदार रविंद्र सबनीस यांना दिले.
यामध्ये २ मे रोजी ऑक्सिजन अभावी व चुकीच्या उपचार पध्दतीमुळे सहा रूग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेची पुनरावृत्ती होवू नये व कोवीड रूग्णांना व इतर रूग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत. तसेच या रूग्णालयात रूग्णाला दाखल करताना अनामत रकमेची सक्ती केली जाते. भरमसाठ बिल आकारणी केली जात आहे. या बाबींचा विचार करून सदरचे कोविड सेंटर बंद करावे या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर मराठा क्रांतीचे उमेश कुरळपकर, दिग्वीजय पाटील, सचिन पवार, सागर जाधव, विजय महाडिक, सुहास पाटील, वैभव कोकाटे, विजय पाटील यांच्या सह्या आहेत.