सांगली थायलंड मधील फुकेट येथे झालेल्या मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये सांगली सीआयडीच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या ( Deputy Superintendent Police ) थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडियाच्या विजेत्या ठरल्या आहेत. याशिवाय या स्पर्धेतील बेस्ट पर्सनॅलिटीच्या उपविजेत्याही ठरल्या आहेत.
स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे थायलंड मधील फुकेट येथे मिस इंडिया आणि मिसेस इंडिया स्पर्धा संपन्न झाले आहेत. या स्पर्धेसाठी भारतातून एकूण ४२ स्पर्धकांची फुकेट येथील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. १६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा संपन्न झाले आहे. या झालेल्या स्पर्धेत सांगली सीआयडी क्राईम विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आरिफा मुल्ला या थायलंड येथे झालेल्या ग्लॅमन मिसेस इंडिया ठरल्या आहेत. मुल्ला यांनी या स्पर्धेची ऑडिशन पुणे येथे दिली होती.
फिल्मफेअर मिडल इस्टच्या ग्लॅमन या कंपनी तर्फे स्पर्धांचे आयोजन यामध्ये त्यांची निवड झाली होती, आणि त्यानंतर थायलंड येथे फुकेटमध्ये पार पडलेल्या मिसेस इंडिया स्पर्धेत मुल्ला यांनी विजेतेपद पटकावला आहे. त्याशिवाय या स्पर्धेमध्ये बेस्ट पर्सनालिटी स्पर्धेच्या विभागात उपविजेतीपद देखील मुल्ला यांनी मिळवले आहे. फिल्मफेअर मिडल इस्टच्या ग्लॅमन या कंपनी तर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.