ETV Bharat / state

जिल्हाबंदीचा सरकारी कामांना फटका, जिल्हाबंदीमुळे रखडले चिकुर्डे पुलाचे काम

author img

By

Published : May 19, 2020, 4:22 PM IST

सांगली कोल्हापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीवरील पुला लगतच्या खचलेल्या पिचिंगचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, जिल्हा बंदीमुळे माल वाहतुकीस परवानगी न मिळाल्यामुळे ते काम थांबले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या भरावाचे काम संबंधित विभागाने मार्गी लावावे, अशी मागणी चिकुर्डे ग्रामस्थ व प्रवाशांकडून मागणी होत आहे.

जिल्हाबंदीचा सरकारी कामांना फटका, जिल्हाबंदीमुळे रखडले चिकुर्डे पुलाचे काम
जिल्हाबंदीचा सरकारी कामांना फटका, जिल्हाबंदीमुळे रखडले चिकुर्डे पुलाचे काम

सांगली - लॉकडाऊन आणि जिल्हाबंदीचा उद्योगधंद्यांसह सरकारी कामांनाही फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे पुलाच्या भरावाचे काम करण्यास निधी उपलब्ध आहे. परंतु जिल्हा बंदीमुळे काम करण्यासाठी संबंधित ठेकेदारांना जाता येता येत नाही, त्यांमुळे काम अडले आहे. या ठेकेदारांनी याबाबतची रीतसर परवानगी मागितली आहे. बंधाऱ्याचे बर्गे काढण्यासाठी सुद्धा अडचणी येत आहे. शिगाव, कोडोली, कडवी, बंधाऱ्यांची पडझड झालेली आहे, त्याचेही काम या बंदीमुळे रखडले आहे, असे सहायक अभियंता एम. एम. टीटवाडकर यांनी सांगितले.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या वाळवा तालुक्यातील चिकुर्डे येथील वारणा नदीवरील पुला लगतच्या खचलेल्या पिचिंगचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, जिल्हा बंदीमुळे माल वाहतुकीस परवानगी न मिळाल्यामुळे ते काम थांबले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या भरावाचे काम संबंधित विभागाने मार्गी लावावे, अशी मागणी चिकुर्डे ग्रामस्थ व प्रवाशांकडून मागणी होत आहे.

21 ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे नदीकाठची शेती आणि रस्ता खचल्याने पुलाचा भरावदेखील खचून गेला आहे. तो खचलेला रस्ता येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करून मिळावा, अशी मागणी दोन जिल्ह्यातल्या नदीकाठचे शेतकरी व प्रवासी करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. हा पूल दोन्ही जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असल्याने या दोन्ही जिल्ह्याने पुलावर चेक पोस्ट उभे केले आहेत. सध्या पुलाच्या कामासाठी 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत. टेंडर प्रोसेस पूर्ण होऊन वर्क ऑर्डर निघालेली आहे. परंतु या दुरुस्तीच्या कामासाठी लागणारे साहित्य आणण्यास वाहनांना जिल्हा बंदीमुळे अडचण निर्माण होत आहे.

वारणा पट्ट्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी महापुराची धास्ती घेतली आहे. महापुरात वारणा नदीच्या बंधाऱ्याच्या बरग्यामध्ये कचरा अडकल्याने बंधारा बंद झाला. यामुळे पाणी पात्राबाहेर पडून लगतच्या शेतकऱ्यांची शेती आणि रस्ता वाहून गेला आहे. तसेच पुलाचे दगडी पिचिंग वाहून गेले आहे. यामुळे पुलास मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना शेतात ये जा करणे अडचणीचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.