सांगली - महापुराच्या बाबतीत प्रामुख्याने 6 जिल्ह्यात एक मोठा आराखडा दूरगामी विचार करून करण्यात येईल, ज्यामध्ये वडनेर समिती बरोबर तज्ञांशीही लवकरच चर्चा केली जाईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील महापुराच्या नुकसानीबाबत केंद्राकडे तीन मागण्या करण्यात आल्या असून एनडीआरएफचे निकष बदलण्याबरोबर बरोबर नुकसानग्रस्त विमा धारक व्यापाऱ्यांना 50% तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रमुख मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पूरस्थिती आणि मदतीचा आढावा -
सांगली जिल्ह्यातल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. भिलवडी, अंकलखोप, कसबे डिग्रज, मौजे डिग्रज आणि सांगली शहरातील पूर बाधित भागाची पाहणी करत पूरग्रस्तांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधत, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्या लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर परिस्थितीचा आढावा घेतला.
महापुराबाबत राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी दुरगामी विचार करून आराखडा तयार करणार - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली दौरा
महापुराच्या बाबतीत प्रामुख्याने 6 जिल्ह्यात एक मोठा आराखडा दूरगामी विचार करून करण्यात येईल, ज्यामध्ये वडनेर समिती बरोबर तज्ञांशीही लवकरच चर्चा केली जाईल,असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील महापुराच्या नुकसानीबाबत केंद्राकडे तीन मागण्या करण्यात आल्या असून एनडीआरएफचे निकष बदलण्याबरोबर बरोबर नुकसानग्रस्त विमा धारक व्यापाऱ्यांना 50% तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रमुख मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.