ETV Bharat / state

Chhatrapati Shivaji statue issue : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जागेचा तिढा सुटला, भाजप-महाविकास आघाडी गटाकडून जल्लोष

सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जागेचा तिढा सुटला ( Chhatrapati Shivaji statue issue solved ) आहे. भाजप-महाविकास आघाडी गटाकडून जल्लोष करण्यात आला. शिवप्रेमींनी आष्ट्यामध्ये जल्लोष साजरा केला ( political parties Celebration in Ashtya ) आहे.

Chhatrapati Shivaji statue issue
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जागेचा तिढा सुटला
author img

By

Published : Jan 4, 2023, 5:56 PM IST

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचा जागेचा तिढा सुटला

सांगली : आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चिघळलेला प्रश्न अखेर सुटला आहे. प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा हस्तांतरणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागेच्या हस्तांतरणाला परवानगी मिळाल्यानंतर शिवप्रेमींनी आष्ट्यामध्ये जल्लोष साजरा केला ( Chhatrapati Shivaji statue issue solved ) आहे.

बगीचाला परवानगीबाबत : साखर वाटून आणि आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला आहे. बगीचाला परवानगीबाबत पत्र मिळाले असून या बगीच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर आष्टा शहरात सकाळ पासून राजकारण सुरू झाले आहे. आज भाजपकडून बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले ( BJP Appeal bandh in Sangli ) होते. तर महाविकास आघाडी कडून बंदला विरोध करण्यात (Mahavikas Aghadi opposes bandh ) आला होता. दरम्यान आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जागेचा प्रश्न मिटल्याने सकाळपासून असणारा तणाव आता निवळला आहे. दोन्ही गटांकडून सांगली-इस्लामपूर रस्त्यावर जल्लोष करण्यात आला ( political parties Celebration in Ashtya ) आहे.

आंदोलन रास्ता रोको : सांगली-इस्लामपूर रस्त्यावर ठिय्या मारत 'रास्ता रोको' करण्यात आला ( Rasta Roko in Sangli Islampur road ) होता. भाजपाचे नेते व माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवप्रेमींनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. मात्र, पोलिसांनी बळाचा वापर करीत आंदोलकांना हुसकावून लावले होते. यावेळी आंदोलक आणि पोलिसांच्यामध्ये झटापट आणि लाठीचार्जचा देखील प्रकार ( Police action in Rasta Roko ) घडला होता. पोलिसांनी हा 'रस्ता रोको' मोडीत काढत आंदोलकांना ताब्यात घेतले होते. यामध्ये भाजपाचे नेते निशिकांत पाटील यांच्यासह शिवप्रेमींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मंगळवारी पहाटे शिवप्रेमींनी गनिमी काव्याने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, त्यानंतर पुतळ्याचा मुद्दा चिघळला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.