सांगली - हिवाळ्यात नवजात शिशू आणि दहा वर्षाच्या आतील मुलांच्या ( Children In The Winter ) बाबतीत विशेष काळजी घेणं खूप गरजेचं असतं. थंडीच्या या ऋतूमध्ये ( Winter Season ) लहान मुलांना व्हायरल इन्फेक्शन ( Viral Infections ) म्हणजे साथीच्या आजारांची लागण होते. अनेक वेळा नवजात शिशु ( Newborn Baby ) किंवा लहान मुले त्यांची प्रकृती खूपच खालावून जिवीताला धोकाही पोहोचू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात या मुलांची विशेष काळजी घेणं खूप गरजेचे असते. हिवाळ्यात नवजात शिशूंची नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? कशा पद्धतीची दक्षता घायला हवी, याबाबत सांगलीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सुहास कुंभार ( Pediatrician Dr. Suhas Kumbhar ) यांच्याकडून माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी...
थंडीचा लहान मुलांवर परिणाम -
हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंडीमुळे साथीच्या रोगांचा फैलाव अधिक प्रमाणात असतो, हिवाळ्यातील कडक थंडी ( Extreme Cold ) साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण निर्माण करणारी असते. सर्दी-खोकला ( Cold-cough ), ताप अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात असतात. थंडीत सर्वाधिक धोका असतो तो नवजात शिशु आणि 10 वर्षाच्या आतील मुलांना. त्यामुळे लहान मुलांची काळजी सर्वाधिक घेणे गरजेचे आहे.
नवजात शिशुची काळजी कशी घ्यावी -
थंडीत जन्मलेल्या मुलाच्या बाबतीत विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आपण थंडीच्या बचावासाठी कपडे घालतो. त्याप्रमाणे थंडीत जन्मजात मुलाला उबदार कपडे घातले पाहिजेत. लहान मुलांचे जन्मजात वजन कमी असतं. पण शरिराचा आकार जास्त असल्याने थंडीने शरीराचे तापमान कमी होऊन "हायपोथर्मिया"चा ( Hypothermia ) मोठा धोका असतो. त्यामुळे नवजात शिशुला स्वेटर, कान टोपी, पायमोजे अशी सर्व उबदार कपडे घालणे अत्यंत गरजेचे आहे. या काळजी घेतल्या नाही, तर बाळावर थंडीचा परिणाम होऊन शरीराचे तापमान कमी होते. मग बाळाला हायपोथर्मिया होऊन साखर कमी होणे, बाळ सुस्त पडणे आणि अचानक अत्यावस्थ होऊ शकते. त्यामुळे बाळाचे शरीराचे तापमान ( Body Temperature ) कमी होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आईने नेहमी बाळाला त्याच्या सान्निध्यात ठेवले पाहिजे, ज्यामुळे आईची ऊब देखील बाळाला मिळू शकते.
काय आहेत प्राथमिक लक्षणे -
बाळ जास्त झोपू लागलं आहे. दूध पित नाही, अशा गोष्टी समोर आल्यास त्याच्या अंगातील साखर कमी होऊ लागली आहे. त्यामुळे तातडीने डॉक्टरांच्याकडे घेऊन जाणे, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणे गरजेचे असते. तसेच किमान सहा महिने बाळाला स्तनपान करणे आवश्यक आहे. दर 2 तासाला दूध पाजणे गरजेचे आहे. ज्यातून बाळाला आईची ऊब मिळते. दूध मिळते, ताकत मिळते त्यामुळे बाळाची शुगर चांगली राहते. बाळाचा थंडीपासून आपण बचाव करू शकतो.
व्हायरल इन्फेक्शन आणि काळजी -
जन्मजात मुलाला शक्यतो लगेच व्हायरल इन्फेक्शन होत नाही. पण जर आईला किंवा घरातील अन्य व्यक्ती अथवा इतर लहान मुलांना सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्या बाळाला व्हायरल इन्फेक्शन होऊ शकते. थंडीत ती शक्यता जास्त असते. मग लगेच 'त्या' बाळाला सर्दी होऊन नाक जाम होते. श्वास घेता येत नाही, मग दूध पिता येत नाही आणि धाप लागण्याची शक्यता असते. मग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे इन्फेक्शन खाली उतरून ( Bronchiolitis ) छाती भरते. त्यामुळे हे होण्याआधी पाल्यांनी बाळाला जर धाप लागणे, दूध न पिणे किंवा दूध पिताने सोडणे, रात्रीची झोप न लागणे अशी लक्षणे दिसल्यास घरी न बसत त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
थंडीत दमा/अस्थमा मुलांचा काळजी -
दोन वर्षाच्या वरील आणि दहा वर्षाच्या आतल्या मुलांवर देखील थंडीचा परिणाम होतो. ज्या मुलांना दम्याचा त्रास किंवा अस्थमा आहे.त्यांना उन्हाळ्या नंतर हिवाळ्याचा ऋतू अशा बदलत्या हवामाना मुळे दम्याचा झटका येण्याची धोका अधिक असतो,अचानक वातावरणातील बदलामुळे अश्या मुलांना सर्दी,खोकला,छाती भरते,दम लागतो, त्यामुळे अश्या मुलांची काळजी घेतली पाहिजे.अस्थमा असणारया मुलांच्या औषध-गोळ्या नियमितपणे चालू ठेवल्या पाहिजेत. बाहेर जाताना फेस मास्क घालणं आवश्यक आहे. धुळीपासून स्वतःच रक्षण करणे गरजेचे आहे. बाहेरील बेकरीच्या तसेच थंड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. गरम पाणी या काळात पिणे आवश्यक आहे.
व्हायरल डायरियाचा धोका -
दोन वर्षाच्या मुलांच्या मध्ये विशेषता थंडी मध्ये व्हायरल डायरिया ( Diarrhea ) साथ येण्याची जास्त जास्त शक्यता असते. छाती भरणे एका साथ असते ज्याला Rotavirus Diarrhea म्हटले जाते. ती साथ डिसेंबर-जानेवारीमध्ये लहान मुलांना लागण्याची दाट शक्यता असते. यामध्ये स्वछता ठेवणे, उकळून पाणी पिणे अशा गोष्टी करणे आवश्यक असून जर लहान मुलांना जुलाब, उलट्या लागल्यास डॉक्टरांशी लगेच संपर्क केला पाहिजे.
त्वचा संरक्षण गरजेचे -
हिवाळ्यात मुलांची त्वचा कोरडी पडत असते. त्यामुळे खाज सुटते, इन्फेक्शन होऊ लागते अश्या वेळी आंघोळ करताना कोणत्याही प्रकारचा साबण टाळला पाहिजे आणि कोठेही कोल्ड क्रीम लोशन वापरावे. ज्यामुळे मुलांची त्वचा ड्राय होण्यापासून वाचू शकते.