सांगली गाडी चोरून मालकालाच पुन्हा गाडी कोण नेली आहे, अशी विचारणा करत मालकासोबत पोलीस ठाण्यात जाऊन गाडी चोरीची फिर्याद देणारा ड्रायव्हरचं गाडी चोर निघाला Car Driver Turned Out Car Thief आहे. संजयनगर पोलिसांनी या प्रकरणी चालक अमर भिसे व त्याच्या साथीदाराला अटक करत चोरलेली गाडी हस्तगत केली आहे.
माधवनगर येथील नरेश बजाज या व्यापाऱ्याची इनोव्हा गाडी 24 एप्रिल 2022 रोजी चोरीला गेल्याची घटना घडली होती. घटनेच्या दिवशी त्यांच्या चोरीला गेलेल्या गाडीवर चालक असणारा अमर भिसे सकाळी मालक बजाज यांच्या घरी पोहचला होता. गाडी दिसत नसल्याने त्याने, बजाज यांना गाडी कोणी घेऊन गेले आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर बजाज यांनी घरात गाडीचा शोध सुरू केला असता, आपली इनोव्हा गाडी चोरीला गेल्याची बाब त्यांच्या समोर आली. त्यानंतर बजाज आणि गाडी चालक अमर भिसे दोघांनी संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती. सदर गाडी चोरीबाबत पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी गाडी चोरीचा सखोल तपास सुरू केला होता. प्राथमिक तपासात गाडी चालकावर संशयाला आल्याने चालक अमर भिसे यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. यावेळी शिंदेमळा येथील लवली सर्कल जवळ चालक अमर भिसे व त्याचा मित्र संतोष सुर्यवंशी हे दोघेजण चोरीला गेलेल्या इनोव्हा गाडीसोबत दिसून आले, त्यानंतर पोलिसांनी तातडीने गाडीसह अमर भिसे व त्याच्या मित्राला ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस खाक्या दाखवताच मालकाची गाडी त्याने आपल्या मित्राच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी अमर भिसे व संतोष सूर्यवंशी या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती संजय नगर पोलिसा ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी दिली आहे.Car Driver Turned Out Car Thief, Two People Arrested With Stolen Innova car
हेही वाचा येवला शहरात चोरट्यांचा सुळसुळाट.. तीन ठिकाणी चोऱ्या