ETV Bharat / state

सांगली : कुरळप अन चिकुर्डे मंडलांतर्गत शासकीय पेन्शनधारकांचा मेळावा - श्रावणबाळ योजना

टाळेबंदीमुळे वाहतुकीवर आलेले निर्बंध कार्यालयातील मोजकेच कामगार व कोरोना होण्याची भीती यामुळे कुरळप येथे कुरळप आणि चिकुर्डे मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या 16 गावातील पेन्शन धारकांचा मेळावा घेण्यात आला. यामुळे तहसीलदार कार्यालयाला जाण्या-येण्याचा वेळ, पैसे वाचल्याने पेन्शनधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

spot photo
कागदपत्रके देताना पेन्शनधारक
author img

By

Published : Jun 7, 2020, 1:19 PM IST

Updated : Jun 7, 2020, 2:14 PM IST

सांगली - वाळवा तालुक्यातील कुरळप येथे कुरळप आणि चिकुर्डे मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या 16 गावातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजने अंतर्गत पेन्शन मंजूर झालेल्या लोकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

माहिती देताना मंडल अधिकारी

यावेळी वाळव्याचे तहसीलदार यांच्या सुचनेनुसार टाळेबंदीच्या काळात वाहतूक बंद असल्याने गावाजवळील मंडळ कार्यालयामार्फत जागेवरच योग्य त्या सुविधा मिळाव्यात यासाठी कुरळप चिकुर्डे मंडळ अंतर्गत मेळावा घेण्यात आला. यावेळी 27 विधवा निराधार महिलांच्या व अपंग लोकांच्या कागदपत्रांची छाननी करून खतावनी करण्यात आली. पुढील पेन्शन अनुदानासाठी पाठवण्यात आली. या प्रकारच्या नियोजनामुळे लोकांचा वेळ, पैसे, त्रास वाचल्याने लोकांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी कुरळप चिकुर्डे मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे बी. एम. कदम, कुरळपचे तलाठी डी, डी, आडार्री, ऐतवडे खुर्दचे संजय पाटील, इटकरेचे उत्तम कांदेकर, जयंत द्रारीद्र्य निर्मूलन अभियानचे कुरळप चिकुर्डे विभागीय संघटक, शशिकांत वायदंडे, कामेरी विभागीय संघटक, किरण खोत, ओंकार घोरपडे, सुरेश जाधव, उत्तम जाधव, सागर शिंदे, वसंत गुरव, महेश कांबळे इत्यादी उपस्थित होते.

हेही वाचा - ट्रॅक्टर पलटी होऊन एकाचा मृत्यू; जत तालुक्यामधील येळदरीतील घटना

Last Updated : Jun 7, 2020, 2:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.