सांगली - मिरजेच्या ख्वाजा वसाहतीमध्ये 2 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. 6 तोळे सोन्याच्या दगिन्यांसह 40 ते 50 हजारांची रोकड असा सुमारे साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. बंद घर असल्याचा डाव साधत चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
मिरजेत दोन ठिकाणी घरफोडी.. सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास - सांगलीत साडेतीन लाखांची चोरी
मिरजेच्या ख्वाजा वसाहतीमध्ये 2 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. 6 तोळे सोन्याच्या दगिन्यांसह 40 ते 50 हजारांची रोकड असा सुमारे साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
Burglary at two places in Miraj
सांगली - मिरजेच्या ख्वाजा वसाहतीमध्ये 2 ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. 6 तोळे सोन्याच्या दगिन्यांसह 40 ते 50 हजारांची रोकड असा सुमारे साडे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. बंद घर असल्याचा डाव साधत चोरट्यांनी ही घरफोडी केली आहे. याप्रकरणी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
मिरज शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या ख्वाजा वसाहत याठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा प्रकार घडला आहे. दोन ठिकाणी घरफोडी आणि एक ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील 25 नंबर शाळेजवळ राहणारे जानी हुसेन मुल्ला यांच्या बंद खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश करत तिजोरीतील 3 तोळे सोने आणि 30 ते 35 हजार रुपये रोख रक्कम तसेच मशीद जवळ राहणाऱ्या हुसेन बशीर मुजावर यांच्याही खोलीचे कुलूप तोडून तिजोरीतील तीन तोळे सोने आणि 2 हजार 500 रूपये असा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकी पोलीस आणि मिरज पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

Last Updated : Mar 6, 2021, 7:10 PM IST