ETV Bharat / state

धक्कादायक... एकाच सापाने आधी भावाचा, नंतर विवाहित बहिणीचा घेतला बळी, एका वर्षाची चिमुरडी झाली पोरकी - सर्पदंशाने बहिण-भावाचा मृत्यू

एका सापाने सख्या बहिण-भावाचा बळी घेतला आहे. सर्पदंशामुळे एकापाठोपाठ बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. घरात लपलेल्या मण्यार जातीच्या सापाने आधी भावाला चावले, त्याच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनासाठी माहेरी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाने चावल्याची घटना खानापूर तालुक्यातील आळसंदमध्ये घडली आहे.

मृत
मृत
author img

By

Published : Oct 16, 2021, 8:11 PM IST

Updated : Oct 18, 2021, 1:46 PM IST

सांगली - एका सापाने सख्या बहिण-भावाचा बळी घेतला आहे. सर्पदंशामुळे एकापाठोपाठ बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. घरात लपलेल्या मण्यार जातीच्या सापाने आधी भावाला चावले, त्याच्या मृत्यूनंतर रक्षाविसर्जनासाठी माहेरी आलेल्या बहिणीलाही त्याच सापाने चावल्याची घटना खानापूर तालुक्यातील आळसंदमध्ये घडली आहे.

सर्पदंशमुळे विराजचा मृत्यू

खानापूर तालुक्यातील आळसंदमध्ये एका सख्या बहीण-भावाच्या साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 6 ऑक्टोबरला आळसंदमध्ये राहणाऱ्या विराज सुनिल कदम (वय 16 वर्षे) यास मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असताना अतिविषारी समजल्या जाणाऱ्या मण्यार जातीच्या सापाने दंश केला होता. सकाळपर्यंत त्याला काय झाले हे कुटुंबाला समजले नसल्याने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा अंत झाला. विराजच्या अचानक झालेल्या मृत्यूने कदम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले.

बहिणालाही त्याच सापाने केले लक्ष

मृत विराजचे वडिल सुनिल कदम हे शेतकरी असून टेलरिंगचा व्यवसाय करत होते. त्यांना विराज हा एकुलता एक मुलगा व दोन मुली होत्या. तर भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या रक्षाविसर्जनसाठी मृत विराजची बहीण सायली जाधव (वय 22 वर्षे) ही माहेरी आली होती. विराजच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम हा शुक्रवारी (दि. 8) होता. गुरूवारी रात्री सर्वजण झोपले असताना घरात लपून बसलेल्या त्याच मण्यार सापाने सायलीलाही दंश केला. तत्काळ सायली जाधव हिला विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. पण, गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेणाऱ्या सायलीची प्रकृती खालावली आणि अखेर शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी उपचारा दरम्यान सायलीचाही अंत झाला.

आईविना चिमुरडी झाली पोरकी

सायली जाधवला एक वर्षाची मुलगी आहे. आईला सर्पदंश झाल्यापासून ती आईपासून वेगळी आहे. आईला भेटण्यासाठी ती आतूर होती. दररोज ती चिमुकली आईला भेटण्यासाठी हंबरडा फोडत होती. मात्र, तिची आई तिला कायमची सोडून गेली आहे. त्यामुळे आईला भेटाण्याची इच्छा अपुरीच राहिली असून ती आता आईविना पोरकी झाली आहे.

मन सुन्न करणारी घटना

भावाला विषारी मण्यार जातीच्या सापाने दंश केले त्यानंतर त्याच सापाने बहिणीलाही दंश केले. एकापाठोपाठ भावा-बहिणीचा अंत झाल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. दोघा बहिण-भावाच्या या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा - तुमच्या सारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा नाही - गोपीचंद पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Last Updated : Oct 18, 2021, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.