ETV Bharat / state

काँग्रेस आणि वंचितच्या पडळकरांमुळे भाजपच्या संजयकाका पाटलांचा विजय बनला सुकर

अनेक राजकीय घडामोडीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या उमेदवारीची माळ वसंतदादा घराण्यातील विशाल पाटलांच्या गळ्यात घातली. बॅट चिन्ह घेऊन विशाल पाटील हे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांसमोर उभे राहिले. गेल्या अनेक वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हाताला मतदारांनी साथ दिली आहे.

काँग्रेस आणि वंचितमुळे भाजप विजयी
author img

By

Published : May 25, 2019, 11:32 PM IST

सांगली - लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत संजय पाटलांच्या विजयाचे अप्रत्यक्ष शिल्पकार ठरले ते म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर. पाहुया संजयकाका पाटलांच्या विजयी फॅक्टरचा एक स्पेशल रिपोर्ट...

काँग्रेस आणि वंचितमुळे भाजप विजयी

सांगली मतदारसंघात भाजपच्या संजय पाटलांनी स्वाभिमान पक्षाच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला आहे. मात्र, हा विजय मिळवत असताना या विजयाची वाट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमुळे सुकर बनली.

सांगली लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या ठिकाणी विद्यमान भाजप खासदार संजय पाटील यांच्या विरोधात कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. २०१४ च्या निवडणुकीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा संजय पाटलांनी पराभव केला होता, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रतीक पाटील आणि विद्यमान खासदारांमध्ये लढत होईल, असेच साधारणता मानले जात होते. प्रतीक पाटलांची निवडणूक लढविण्यात असणारी उदासीनता ५ वर्षात असलेला संपर्क काँग्रेसमधील असणारा अंतर्गत कलह अशा सर्व पातळ्यांवर उमेदवार कोण ? हा घोळ काँग्रेसमध्ये सुरू होता. या घोळात काँग्रेसने सांगलीची जागा लढवण्यापेक्षा सोडून देत आपल्या घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली.

अनेक राजकीय घडामोडीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या उमेदवारीची माळ वसंतदादा घराण्यातील विशाल पाटलांच्या गळ्यात घातली. बॅट चिन्ह घेऊन विशाल पाटील हे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांसमोर उभे राहिले. गेल्या अनेक वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या हाताला मतदारांनी साथ दिली आहे. पण यंदा हात चिन्ह नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही, तर काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये संभ्रमावस्था होती. तरीही विशाल पाटील यांनी प्रचाराचा धडाका उडवत आघाडी घेतली होती. गेल्या काही महिन्यापर्यंत भाजपत असणारे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासोबत बिनसल्याने त्यांनी संजय पाटलांच्या विरोधात बंड पुकारात भाजपकडून ज्या दिवशी संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली, त्याच वेळी गोपीचंद पडळकर यांनी संजय पाटलांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. राज्यात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी रान उठवत धनगर समाजाचा एक दमदार नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळवले. सांगली जिल्ह्यातही धनगर समाजाची संख्या लक्षणीय असून समाजातील लढवय्या नेता म्हणून पाहिले जाते. अशा सर्व स्थितीत पडळकर यांनी संजय पाटील यांच्या विरोधात लढताना वंचित बहुजन आघाडीचा पर्याय स्वीकारला. जिल्ह्यातील धनगर, दलित, मुस्लीम समाजाबरोबर बहुजन समाजाला पडळकर यांनी हाक देत दणक्यात प्रचार केला.
अशा स्थितीत अत्यंत चुरशीने सांगली लोकसभेची निवडणुकी पार पडली. ६५.३८ टक्के इतके मतदान झाले, गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा सव्वा टक्के मतांच्या टक्केवारीत वाढ होती, त्यामुळे वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार. याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. बॅट निवडून येणार तर वंचितचे पडळकर बाजी मारणार अशी हवा निर्माण झाली होती.
मात्र, या सर्वांना छेद देत भाजपचे संजय पाटील हे आपला मतदार शाबूत ठेवत विजयी झाले. या निवडणुकीत भाजपचे पाटील यांना ५ लाख ८ हजार ९९५ इतके मते मिळाली आहेत. तर काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना ३ लाख ४४ हजार ६४३ इतकी मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना ३ लाख २३४ इतकी मते मिळाली. संजयकाका पाटील यांची मते आणि विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांच्या मतांची गोळाबेरीज पाहता संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी दुरंगी लढत झाली असती किंवा वंचितकडून पडळकर जर मैदानात नसते तर कदाचित सांगली लोकसभेचे चित्र वेगळे दिसले असते.
या मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. ज्या मध्ये ३ भाजपाचे व १ शिवसेनेचे आमदार आहेत. आणि एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघासह युतीच्या आमदारांच्या मतदारसंघात संजय पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले आहे. या मतांची आघाडी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीचा भाजपचा मार्ग सुकर होणार आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Feed send - file name - MH_SNG_SANJAY_PATIL_WIN_ANALYSIS_25_MAY_2019_PTC_7203751 - 

स्लग - भाजपच्या संजयकाका पाटलांचा विजयाचा मार्ग काँग्रेस आणि वंचितच्या पडळकरांमुळे बनला सुकर...

अँकर - सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील पुन्हा विजयी झाले आहेत.सलग दुसऱ्यांदा संजयकाका पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.मात्र या निवडणुकीत संजयकाका पाटलांच्या विजयाचे अप्रत्यक्ष शिल्पकार असतील तर ते म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची गोपीचंद पडळकर.पाहूया संजयकाका पाटलांच्या विजयी फॅक्टरचा एक स्पेशल रिपोर्ट...

Body:सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात भाजपच्या संजय पाटलांनी स्वाभिमान पक्षाच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना चितपट केले आहे.मात्र हा विजय मिळवत असताना या विजयाची वाट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमुळे सुकर बनली.

सांगली लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी या ठिकाणी विद्यमान भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात कोण प्रश्न निर्माण झाला होता. 2014 च्या निवडणुकीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचा संजय पाटलांनी पराभव केला होता,त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रतीक पाटील आणि विद्यमान खासदारांच्या मध्ये लढत होईल असेच साधारणता मानलं जात होतं. प्रतीक पाटलांची निवडणूक लढविण्यात असणारी उदासीनता पाच वर्षात असलेला संपर्क काँग्रेस मधील असणारा अंतर्गत कलह अशा सर्व पातळ्यांवर उमेदवार कोण ? द्यायचा हा घोळ काँग्रेसमध्ये सुरू होता.आणि अशा या घोळात काँग्रेसने सांगलीची जागा लढवण्यापेक्षा सोडून टाकणे पसंत करत

आपल्या घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ केली.आणि अनेक राजकीय घडामोडी नंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या उमेदवारीची माळ वसंतदादा घराण्यातील विशाल पाटलांच्या गळ्यात घातली.आणि बॅट चिन्ह घेऊन विशाल पाटील हे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारयांच्यासमोर उभे राहिले.गेल्या अनेक वर्षांपासून या लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या हाताला मतदारांनी साथ दिली आहे.पण यंदा हात चिन्ह नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला नाही,तर काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांच्या मध्ये संभ्रमावस्था होती.तरीही विशाल पाटील यांनी प्रचाराचा धडाका उडवत आघाडी घेतली होती.

तर गेल्या काही महिन्यांन पर्यंत भाजपात असणारे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचे खासदार संजयकाका पाटील यांच्यासोबत बिनसल्याने त्यांनी संजयकाका पाटलांच्या विरोधात बंड पुकारात भाजपाकडून ज्या दिवशी संजय पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली, त्याच वेळी गोपीचंद पडळकर यांनी संजय पाटलांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं. राज्यात धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी रान उठवत धनगर समाजाचा एक दमदार नेतृत्व म्हणून नावलौकिक मिळवलं.तर सांगली जिल्ह्यातही धनगर समाजाची संख्या लक्षणीय असून समाजातील लढवय्या नेता म्हणून पाहिले जाते.अश्या सर्व स्थितीत पडळकर यांनी संजयकाका पाटील यांच्या विरोधात लढताना वंचित बहुजन आघाडीचा पर्याय स्वीकारला. जिल्ह्यातील धनगर,दलित,मुस्लिम समाजा बरोबर बहुजन समाजाला पडळकर यांनी हाक देत दणक्यात प्रचार केला.

अश्या सर्व स्थितीत अत्यंत चुरशीने सांगली लोकसभेची निवडणुकी पार पडली.आणि ६५ .३८ टक्के इतके मतदान झालं,गत निवडणूकीच्या तुलनेत यंदा सव्वा टक्के मतांच्या टक्केवारीत वाढ होती,त्यामुळे वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार.याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते.बॅट निवडून येणार तर वंचितचे पडळकर बाजी मारणार अशी हवा निर्माण झाली होती.

यामुळे भाजपातही धाकधूक लागली होती.

मात्र या सर्वांना छेद देत भाजपाचे संजयकाका पाटील हे आपला मतदार शाबूत ठेवत विजयी झाले. या निवडणुकीत भाजपाचे संजयकाका पाटील यांना 5 लाख 8 हजार 995 इतके मते मिळाली आहेत.तर काँग्रेस महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 इतकी मते मिळाली आहेत.आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 इतकी मते मिळाली.

संजयकाका पाटील यांची मते आणि विशाल पाटील व गोपीचंद पडळकर यांच्या मतांची गोळाबेरीज पाहता 

संजयकाका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी दुरंगी लढत झाली असती किंवा वंचित कडून पडळकर जर मैदानात नसते तर कदाचित सांगली लोकसभेचे चित्र वेगळे दिसले असते.

Conclusion:तर या मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.ज्या मध्ये ३ भाजपाचे व १ शिवसेनेचे आमदार आहेत.आणि एक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.आणि या लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच्या मतदार संघासह युतीच्या आमदारांच्या मतदारसंघात संजयकाका पाटील यांना चांगले मताधिकक्य मिळाले आहे.आणि या मतांची आघाडी पाहता आगामी विधानसभा निवडणुकीचा भाजपाचा मार्गा सुकर होणार आहे..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.