सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सांगलीत शिवसैनिकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फोटोला काळे फासले. यानंतर प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून शिवसेनेचा निषेध करण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे दुग्धाभिषेक पार पडले.
नारायण राणेंच्या फोटोला दुग्धाभिषेक करत भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर राणेंच्या फोटोला दुग्धाभिषेकसांगलीतील विश्रामबाग इथे असणाऱ्या आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयाबाहेर लावलेल्या पोस्टरवरील नारायण राणेंच्या फोटोला सांगलीतील शिवसैनिकांच्या वतीने काळे फासण्यात आले होते. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर भाजपच्या वतीने हे पोस्टर उतरवण्यात आलं आणि शिवसेनेच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून शिवसेनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते यावेळी नारायण राणे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनाला भाजपाच्या वतीने जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
हेही वाचा - केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते पण... - कायदेतज्ज्ञ असीम सरोदे