सांगली - भाजपा आणि धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगलीच्या आटपाडी या दुष्काळी भागातून गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली होती. आक्रमक नेते म्हणून पडळकर यांची ओळख आहे.
भाजपने सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील भाजपाचे नेते व धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषद उमेदवारी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक भाजपचे दिगग्ज नेते उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. मात्र, विधानसभा निवडणुकी दरम्यान पुन्हा पक्ष प्रवेशावेळी दिलेल्या शब्दानुसार पडळकर यांना उमेदवारी देत आपला शब्द पाळला आहे.
गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास
आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे गोपीचंद पडळकर यांचे मूळ गाव आहे. धनगर समाजातील असणारे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते समजले जाणारे माजी मंत्री महादेव जानकर यांचे कट्टर कार्यकर्ते व राष्ट्रीय समाज पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. राष्ट्रीय समाज पक्षातून गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली. २००९ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदा खानापूर-आटपाडी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०१२ मध्ये सांगली जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीत करगणी गटातून गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवली होती.
पुढे महादेव जानकर यांच्याशी फारकत घेऊन पडळकर यांनी भाजपाची वाट धरली. त्यांनतर भाजपकडून २०१४ मध्ये पडळकर यांना खानापूर- आटपाडी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यावेळीही पडळकर यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चळवळ सुरू केली. आक्रमक वक्तृत्वशैलीमुळे ते भाजपचे स्टार प्रचारक बनले. भाजप युवा मोर्चाचे नेतृत्वसुद्धा पडळकर यांनी केले आहे.
धनगर आरक्षण मुद्द्यावरून त्यांनी आपल्याच पक्षाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ज्यातून पुढे पडळकर यांनी भाजपला २०१९ मध्ये सोडचिठ्ठी दिली. धनगर आरक्षणप्रश्नी भाजपच्या विरोधातील हार्दिक पटेल यांना घेऊन देश आणि राज्यात गोपीचंद पडळकर यांनी रान उठवले. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत, भाजपचे विद्यमान खासदारांच्या विरोधात सांगली लोकसभा निवडणूक लढवली. ज्यामध्ये पडळकर यांना तब्बल साडेतीन लाखांचे मताधिक्य मिळाले, पण त्यांचा पराभव झाला.
त्यानंतर २०१९ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये घरवापसी केली. त्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून विधानसभा निवडणुकीत उतरवले होते. मात्र, त्याठिकाणीही त्यांचा पराभव आला होता. तर प्रवेशावेळी भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना आमदार करण्याची ग्वाही देण्यात आली होती. दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजपने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे धनगर समाज आणि आटपाडी तालुक्यात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेची लॉटरी, पाहा राजकीय प्रवास... - sangli latest news
भाजपा आणि धनगर आरक्षण आंदोलनाचे नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. सांगलीच्या आटपाडी या दुष्काळी भागातून गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाली होती.