ETV Bharat / state

ओबीसी नेते काका-पुतण्याच्या ताटाखालील मांजर, तर मंत्री झालेत माकड - गोपीचंद पडळकर - bjp mla gopichand padalkar on reservation

ओबीसी आरक्षण रद्द वरून महाविकास आघाडी सरकार मधील ओबीसी मंत्री आणि नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. आमदार पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधील सर्व ओबीसी नेते हे पवार काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी मंत्री ही माकड झाले आहेत. तसेच या ओबीसी मंत्र्याच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेत्यांवर केली आहे.

गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jun 24, 2021, 2:03 PM IST

Updated : Jun 24, 2021, 4:40 PM IST

सांगली - महाविकास आघाडी सरकार मधील ओबीसी नेते हे पवार काका-पुतण्याच्या ताटाखालील मांजर झाले आहेत, तर ओबीसी मंत्री ही माकडे झाली आहेत, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.

मंत्री झालेत माकड - गोपीचंद पडळकर
देवेंद्र फडणवीसांच्याकडून चोख उत्तर..राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र याठिकाणी ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे. या मुद्द्यावरून राज्यात जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. ओबीसी समाजाला दगाफटका करणाऱ्या महाविकास आघाडीला देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर देत, निवडणुकीमध्ये ओबीसी, बहुजन, बाराबलुतेदारांना उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे प्रवक्ते व आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट करत आभार मानले आहेत.ओबीसी नेते मांजर तर मंत्री माकडे-

तर ओबीसी आरक्षण रद्द वरून महाविकास आघाडी सरकार मधील ओबीसी मंत्री आणि नेत्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. आमदार पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकार मधील सर्व ओबीसी नेते हे पवार काका पुतण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी मंत्री ही माकड झाले आहेत. तसेच या ओबीसी मंत्र्याच्या शब्दाला कवडीची किंमत राहिली नाही, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी नेत्यांवर केली आहे.

ओबीसी नेत्यांचे शब्द मातीमोल !

जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण पुनर प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणूक होणार नाहीत, अशी भीम गर्जना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या निवडणूक जाहीर झाल्या. या ओबीसी नेत्यांच्या शब्दाची मातीमोल किंमत या आघाडी सरकारने केली आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असेही पडळकर म्हणाले.

ओबीसी नेत्यांनी आत्मसन्मान विकला !

तसेच ओबीसी नेते हे मलिदा खाण्यासाठी सत्तेमध्ये आहेत का ? त्यांनी आपला आत्मसन्मान विकला आहे का ? असा सवाल उपस्थित करत या सर्व प्रश्नावर महाराष्ट्रातील ओबीसी समाज जागृत झाला असून येत्या 26 तारखेला ओबीसी समाज आपली ताकत दाखवत, आघाडी सरकारला जागा दाखवणार असल्याचा इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला आहे.

Last Updated : Jun 24, 2021, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.