ETV Bharat / state

"संजय राऊत बिनबुडाचा लोटा; खातो सेनेचे, जागतो पवारांना" - गोपीचंद पडळकर-संजय राऊत न्यूज

'खासदार संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा आहेत. हा खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना', अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

sangli
sangli
author img

By

Published : Jun 27, 2021, 3:46 PM IST

सांगली - 'खासदार संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा आहे. हा खातो शिवसेनेचं आणि जागतो पवारांना', अशी घणाघाती टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. सामनातील संपादकीय लेख आणि ओबीसी आरक्षणावरून संजय राऊत यांच्याकडून होणाऱ्या विधानावरून पडळकर यांनी संजय राऊत यांच्यावर घणघोर टीका केली आहे. पडळकर आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

'राऊतासारख्या भाटाची धनगर समाजाला अजिबात गरज नाही'

'संजय राऊतासारख्या भाटाची धनगर समाजाला अजिबात गरज नाही. मुळात जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला, यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 हजार कोटी रुपयांची तरतुद केली होती. मात्र, राऊताच्या मालकाने त्यातील एकही रुपया दिला नाही. त्याबद्दल आधी राऊताने बोलले पाहिजे. ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी 23 अध्यादेश काढले, हे राऊताला माहिती नाही. 23 अध्यादेशांपैकी एकाही जीआरची अंमलबजावणी आघाडी सरकारने केली नाही. त्याचा आपण जाहीर निषेध करतो', असे पडळकरांनी म्हटले आहे.

'असला हुजऱ्या झाला नाही अन् होणारही नाही'

'भावा-भावांमध्ये भांडण लावून दस्त लेखकाचे काम करून भावाचा राजीनामा घेतला. आता काकाच्या सांगण्यावरून सामनाच्या अग्रलेखातून बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले हे अजित पवारांच्या किती जवळचे आहेत; हे सांगून अजित पवारांच्या मागे फटाके वाजवण्याचे काम हा हुजऱ्या करतोय. असा हुजऱ्या कधी जन्माला आला नाही आणि कधी येणारही नाही', अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

हेही वाचा - राज्यातील सरकार पाच वर्षे टिकेल; तिन्ही पक्षांमध्ये योग्य समन्वय - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.